संरक्षण मंत्रालय
एअर मार्शल एस. शिवकुमार यांनी एअर ऑफिसर-इन-चार्ज ॲडमिनिस्ट्रेशन अर्थात हवाई दलाच्या प्रशासन प्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला
Posted On:
01 JUL 2025 3:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जुलै 2025
विशिष्ट सेवा पदक प्राप्त एअर मार्शल एस. शिवकुमार यांनी आज दि. 01 जुलै 2025 रोजी नवी दिल्ली येथील हवाई दलाच्या मुख्यालयात (Air HQ) एअर ऑफिसर-इन-चार्ज ॲडमिनिस्ट्रेशन (AOA) अर्थात हवाई दलाच्या प्रशासन प्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला.
एअर मार्शल एस. शिवकुमार हे जून 1990 मध्ये भारतीय हवाई दलाच्या प्रशासन विभागात रुजू झाले होते. त्यांनी पाँडिचेरी विद्यापीठातून मनुष्यबळ व्यवस्थापनात (HRM) एमबीए (MBA) आणि उस्मानिया विद्यापीठातून संरक्षण आणि रणनैतिक अभ्यास (Defence and Strategic Studies) या विषयात एम.फिल (M Phil) पदवी प्राप्त केली आहे.

आपल्या 35 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या कारकिर्दीत, एअर मार्शल एस. शिवकुमार यांनी अनेक महत्त्वाच्या कमांड आणि अधिकारी पदांवर काम केले आहे. त्यांनी आजवर सीमावर्ती तळ फॉरवर्ड बेसचे वरिष्ठ हवाई वाहतूनक नियंत्रण अधिकारी, काँगो येथील संयुक्त राष्ट्राच्या अभियानात भारतीय हवाई दलाचे प्रतिनिधित्व, हवाई दलाचे परीक्षक,, प्रमुख उड्डाण स्थानकांचे मुख्य प्रशासकीय अधिकारी, दोन ऑपरेशनल कमांड्सचे कमांड वर्क्स ऑफिसर आणि कमांड पर्सनल स्टाफ ऑफिसर, उपकरण साठवणगृहाचे (Equipment Depot) कमांडिग एअर ऑफिसर, हवाई दल मुख्यालयात हवाई दलाचे सहाय्यक प्रमुख (हवाई दलाची कार्ये) आणि कार्यान्वयन कमांडचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी (Senior Officer-in-Charge Administration of an Operational Command) -इन-चार्ज ॲडमिनिस्ट्रेशन यांचा समावेश आहे. हवाई दलाच्या प्रशासन प्रमुखपदाचा पदभार स्विकारण्यापूर्वी ते हवाई दलाच्या मुख्यालयात महासंचालक (प्रशासन) म्हणून कार्यरत होते. एअर मार्शल एस. शिवकुमार यांना विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
* * *
S.Tupe/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2141128)
Visitor Counter : 8