अर्थ मंत्रालय
भारत सरकारच्या खात्यांचा मे 2025 पर्यंतचा मासिक आढावा (आर्थिक वर्ष 2025-26)
Posted On:
30 JUN 2025 6:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जून 2025
भारत सरकारच्या खात्यांचा मे 2025 पर्यंतचा एकत्रित मासिक अहवाल (आर्थिक वर्ष 2025-26) प्रकाशित झाला असून, त्याची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
भारत सरकारला मे 2025 पर्यंत एकूण रु. रु.7,32,963 कोटी इतका महसूल प्राप्त झाला आहे. ही रक्कम अर्थसंकल्पीय अंदाजाच्या (BE 2025-26) 21.0% आहे. यामध्ये कर महसूल (केंद्रासाठी निव्वळ): रु.3,50,862 कोटी, बिगर-कर महसूल: रु.3,56,877 कोटी, -कर्जेतर भांडवली जमा: रु.25,224 कोटी चा समावेश आहे. याच कालावधीत, भारत सरकारने राज्यांना करांच्या वाटणीपोटी रु.1,63,471 कोटी हस्तांतरित केले आहेत. ही रक्कम मागील वर्षाच्या तुलनेत रु.23,720 कोटीने जास्त आहे.
भारत सरकारने मे 2025 पर्यंत एकूण रु.7,46,126 कोटी (संबंधित BE 2025-26 च्या 14.7%) खर्च केला आहे. यापैकी रु.5,24,772 कोटी महसुली खात्यावर आणि रु.2,21,354 कोटी भांडवली खात्यावर खर्च झाले आहेत.एकूण महसूल खर्चापैकी, रु.1,47,788 कोटी व्याजापोटी आणि रु.51,253 कोटी प्रमुख अनुदानांवर खर्च झाले आहेत.
* * *
N.Chitale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2140888)