संरक्षण मंत्रालय
रिअर ॲडमिरल व्ही गणपती यांनी पुणे स्थित लष्करी तंत्रज्ञान संस्थेचे कमांडंट म्हणून स्वीकारला पदभार
प्रविष्टि तिथि:
30 JUN 2025 5:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जून 2025
भारतीय नौदलाचे एक कुशल फ्लॅग ऑफिसर रिअर अॅडमिरल व्ही गणपती यांनी एकात्मिक संरक्षण कर्मचारी मुख्यालय अंतर्गत पुणे स्थित लष्करी तंत्रज्ञान संस्थेचे कमांडंट म्हणून पदभार स्वीकारला आहे. आपल्या गौरवशाली नौदल कारकिर्दीत, रिअर अॅडमिरल गणपती यांनी अनेक प्रमुख परिचालनात्मक, स्टाफ आणि इंस्ट्रक्शनल नियुक्त्यांवर काम केले असून परिचालन अंतर्दृष्टी, संस्थात्मक नेतृत्व आणि भविष्याभिमुख विचाराचे दुर्मिळ मिश्रण दाखवून दिले आहे. कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट, नॅशनल डिफेन्स कॉलेज आणि डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजचे ते माजी विद्यार्थी आहेत.
TYZU.jpeg)
रिअर अॅडमिरल व्ही गणपती यांची कमांडंट म्हणून नियुक्ती अशा परिवर्तनकारी काळात झाली आहे जेव्हा सशस्त्र दल झपाट्याने होत असलेली तंत्रज्ञानातील उत्क्रांती आणि संस्थात्मक एकात्मतेतून जात आहे. भारताच्या प्रमुख त्रि-सेवा तांत्रिक प्रशिक्षण संस्थेचे प्रमुख म्हणून, ते आता लष्कर, नौदल, हवाई दल तसेच मित्र राष्ट्रांमधील करिअरच्या मधल्या टप्प्यातील अधिकाऱ्यांना अत्याधुनिक लष्करी तंत्रज्ञानासाठी तयार करण्याची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांचे नेतृत्व संयुक्त तांत्रिक शिक्षणात उत्कृष्टतेचे केंद्र म्हणून लष्करी तंत्रज्ञान संस्थेची भूमिका अधिक बळकट करण्यासाठी सज्ज असून आधुनिक युद्धाला नव्याने आकार देणाऱ्या विशिष्ट आणि उदयोन्मुख क्षेत्रांवर पुन्हा भर दिला जाईल.
51GP.jpeg)
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2140837)
आगंतुक पटल : 14