पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी ‘हूल दिवस’ निमित्त आदिवासी वीरांना वाहिली आदरांजली
Posted On:
30 JUN 2025 3:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जून 2025
‘हूल दिवस’ या आदिवासी वीरांच्या स्मृतिदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या आदिवासी समाजाच्या अदम्य साहस आणि असामान्य पराक्रमाला विनम्र अभिवादन केले. ऐतिहासिक संथाल विद्रोहाच्या स्मरणार्थ पंतप्रधानांनी सिदो-कान्हू, चांद-भैरव, आणि फूलो-झानो यांसारख्या थोर स्वातंत्र्यसैनिकांसह अन्य असंख्य आदिवासी वीर शहीदांना आदरांजली अर्पण केली, ज्यांनी परकीय सत्तेच्या अत्याचाराविरुद्ध आपले बलिदान दिले.
पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेः
“हूल दिवस आपल्याला आपल्या आदिवासी समाजाच्या अदम्य साहस आणि असामान्य पराक्रमाची आठवण करून देतो. ऐतिहासिक संथाल क्रांतीशी संबंधित या विशेष प्रसंगी सिदो-कान्हू, चांद-भैरव आणि फूलो-झानो यांच्यासह सर्व वीर-वीरांगनांना मन:पूर्वक नमन आणि वंदन, ज्यांनी परकीय सत्तेच्या अत्याचाराविरुद्ध लढताना आपले जीवन अर्पण केले. त्यांचे शौर्य आणि बलिदान देशाच्या प्रत्येक पिढीला मातृभूमीच्या स्वाभिमानासाठी लढा देण्याची प्रेरणा देत राहील.”
* * *
N.Chitale/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2140777)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam