सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अधिकृत सांख्यिकीय माहितीसाठा कधीही कुठेही सुलभ आणि सुरळीतपणे पाहण्यासाठी सहजतेने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या वतीने GoIStats या मोबाइल ॲपचा प्रारंभ

Posted On: 29 JUN 2025 6:43PM by PIB Mumbai

 

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अखत्यारितील राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने 2025 च्या सांख्यिकी दिनाचे औचित्य साधून GoIStats या मोबाइल ॲप्लिकेशनचा आज प्रारंभ केला.   सर्व नागरिकांना अधिकृत आकडेवारी  सुलभतेने आणि वापरकर्ता स्नेही स्वरुपात उपलब्ध करून देण्याच्या केंद्र सरकार वचनबद्ध असून, त्या दिशेनेच हा उपक्रम एक महत्वाचा ऐतिहासिक टप्पा ठरला आहे.

प्रत्येक भागधारकाला उपलब्ध करून दिलेला माहितीसाठी कधीही कुठेही सुलभ आणि सुरळीतपणे पाहता येईल, अशा प्रकारची माहितीसाठा विषयक सर्वसमावेशक परिसंस्था विकसित करण्याचा दृष्टीकोन  राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने मांडला होता. GoIStats या मोबाइल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून त्यांच्या या दृष्टीकोनाची प्रचिती आली आहे. या मोबाइल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून प्रत्येक भागधारकाला अगदी सुलभतेने अधिकृत माहिती पाहता येते. या ॲप्लिकेशनमध्ये एक परस्परसंवादी स्वरुपातील प्रमुख कल अर्थात Key Trends या डॅशबोर्डची सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे. या डॅशबोर्डवरून वापरकर्त्याला राष्ट्रीय सकल उत्पादन, चलन फुगवटा, रोजगार विषयक माहितीसाठा यासह महत्त्वाच्या सामाजिक-आर्थिक निर्देशकांविषयीची माहिती बहुआयामी दृश्य स्वरुपात उपलब्ध करून दिली गेली आहे. या मोबाइल ॲप्लिकेशन मधील उत्पादने (Products) या विभागाअंतर्गत वापरकर्त्यांना थेट राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाचा माहितीसाठी पाहता येतो. इथे त्यांना एका क्लिकवर ही माहिती सीएसव्ही स्वरुपात (CSV - Comma Separated Values) डाउनलोड करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली गेली आहे. याशिवाय या मोबाइल ॲप्लिकेशनवर अत्यंत प्रगत फिल्टरिंग म्हणजे पर्याय निवडण्याची सोय आणि शोध क्षमता, तपशीलवार मेटाडेटा आणि माहिती सुरळीतपणे पाहता यावी यासाठी माहिती विषयक तक्त्यांचे मोबाइल - अनुकूल स्वरुप उपलब्ध करून दिले गेले आहे.

या ॲपच्या व्हिज्युअल डेटा स्टोरीटेलिंग अर्थात माहिती दृश्यस्वरुपात मांडण्याच्या क्षमतांअंतर्गत एका क्युरेटेड इन्फोग्राफिक्स विभागाचा अंतर्भाव केला गेला आहे. या विभागात अत्यंत गुंतागुंतीची आकडेवारी सहज समजून घेता येईल अशा स्वरुपात  रूपांतरित करून दर्शवली जाते. संदर्भात्मक स्पष्टीकरणांसह परस्परसंवादी तक्ते आणि ग्राफिक्स, माहितीसाठा विषयक साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी माहिती विविध समुदायांमध्ये सामायिक करण्याची करण्याची वैशिष्ट्ये आणि पारदर्शकता तसेच विश्वासार्हतेच्या तत्त्वांचे पालन करत प्रत्येक दिसणाऱ्या पानांचे स्त्रोतांची माहिती अशा वैशिष्ट्यांचाही यात अंतर्भाव केला गेला आहे.

या ॲपवर एक तपशीलवार प्रकाशन विभागही असून, इथे वापरकर्त्यांना राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाचे अहवाल आणि प्रकाशने पाहण्याची तसेच ते त्या त्या वेळी डाउनलोड करण्याची सुविधाही दिली गेली आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या प्रकाशन विषयक दिनदर्शिकेनुसार वापरकर्त्यांना नियमित अद्यतने, ॲप संबंधीच्या सूचनाही दिल्या जाणार आहेत. याशिवाय ॲपमध्ये सातत्यपूर्ण सुधारणा करता याव्यात यासाठी अभिप्राय यंत्रणा, ॲपची वापरकर्ता - अनुकूल संरचना, आणि आमच्याशी संपर्क साधा (Contact Us) या विभागाच्या माध्यमातून थेट संवादाचा पर्याय या वैशिष्ट्यांनीही हे ॲप सुसज्ज असून, त्याद्वारे वापरकर्त्यांचेही सक्षमीकरण होणार आहे. सद्यस्थितीत या मोबाइल ॲप्लिकेशनची अँड्रॉइड आवृत्ती गुगल प्ले स्टोअरवर विनामूल्य उपलब्ध आहे. तर आयओएस आवृत्ती लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे. हा उपक्रम म्हणजे माहिती साठ्याची निर्मिती करणाऱ्या संस्थांना अपेक्षा असलेल्या असलेले संकेतस्थळ, पोर्टल आणि मोबाइल ॲप अशा सर्वंकष सुविधांची पूर्तता करणारा एक परिपूर्ण डिजिटल संचच ठरला आहे.

GoIStats या मोबाईल ॲपमुळे प्रत्येक भारतीयाला शासकीय माहितीसाठ्याचा अर्थपूर्ण वापर करण्याची सोयही उपलब्ध झाली आहे, यामुळे विकसित भारताच्या जडणघडणीच्या प्रक्रियेतील नागरिकांचा सहभागही अधिक वाढू शकणार आहे.

GoIStats डाउनलोड करा:

गुगल प्ले स्टोअर : https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.mospi.goistats&hl=en_IN

डाउनलोड करण्यासाठी स्कॅन करा

***

N.Chitale/T.Pawar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2140668)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil