संरक्षण मंत्रालय
पाचव्या 25 टन बोलार्ड पुल टग 'ओजस' (यार्ड 339) चे जलावतरण
Posted On:
28 JUN 2025 9:00AM by PIB Mumbai
'ओजस' या पाचव्या 25 टनी बोलार्ड पुल टगचे 27 जून 2025 रोजी विशाखापट्टणमच्या नौदलाच्या गोदीत जलावतरण करण्यात आले. या कार्यक्रमाला कमोडोर चेतन कुमार सिंह, जीएम (टेक), नौदल डॉकयार्ड (विशाखापट्टणम) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
हा टग म्हणजे 25 टन बोलार्ड पुल (BP) क्षमतेच्या सहा टगच्या बांधकामासाठी मे. टिटागढ रेल्वे सिस्टिम्स लिमिटेड (TRSL), कोलकाता यांच्यासोबत 12 नोव्हेंबर 2021 रोजी झालेल्या कराराचा एक भाग आहे.
या शिपयार्डने भारतीय नौदलाचे संबंधित नियम आणि इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग (IRS) च्या नियमांनुसार या टगची स्वदेशी पद्धतीने रचना आणि बांधकाम केले आहेत.
भारतीय नौदल या टगचा उपयोग नौदलाची जहाजे आणि पाणबुड्यांना बर्थिंग/अन-बर्थिंग (बंदरावर आणताना/काढताना) आणि मर्यादित पाण्यात त्यांना हालचाल करण्यास मदत करण्यासाठी करते. हे टग जहाजांना बंदराजवळ किंवा नांगरले असताना अग्निशमन मदत (firefighting support) पुरवतील आणि त्यांना मर्यादित शोध व बचाव कार्य करण्याचीही क्षमता आहे.
मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या भारत सरकारच्या उपक्रमांचे हे टग्ज अभिमानास्पद ध्वजवाहक आहेत.
73V6.jpeg)
R1UW.jpeg)
P930.jpeg)
***
M.Pange/S.Patil/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2140528)