अंतराळ विभाग
भारतीय अंतराळवीराचा समावेश असलेल्या ड्रॅगन अंतराळयानाची आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी यशस्वीरित्या जोडणी (डॉकींग) झाल्याबद्दल केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी केले अभिनंदन
सात ‘मेड इन इंडिया’ प्रयोग, अंतराळ शाश्वततेच्या क्षेत्रातील मोठी झेप: केंद्रीय राज्यमंत्री डॉ.सिंह
प्रविष्टि तिथि:
26 JUN 2025 7:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 26 जून 2025
देशासाठी एक अत्यंत अभिमानाचा आणि ऐतिहासिक असलेला क्षण साजरा करत केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ.जितेंद्र सिंह यांनी आज ड्रॅगन अंतराळयानाची आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी (आयएसएस) यशस्वी जोडणीची (डॉकींग) प्रशंसा केली. या ड्रॅगन अंतराळयानातील पथकात इतर तीन सदस्यांसह भारतीय अंतराळवीर ग्रुप कप्तान शुभांशु शुक्ला याचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “आत्मनिर्भर भारत” आणि “विश्वबंधु भारत”च्या संकल्पनेतील भावनेला जागत, डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले की शुभांशु शुक्ला करणार असलेले सर्व प्रयोग भारतीय संस्थांनी स्वदेशी पद्धतीने विकसित केलेले आहेत आणि या प्रयोगांतून हाती येणारे निष्कर्ष संपूर्ण जगाशी सामायिक करण्यात येतील.

एक्सिओम-4 मोहिमेतील घडामोडींचे बारकाईने निरीक्षण करत असलेले डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले, “अवकाश संशोधनात भारताची भूमिका आता केवळ प्रक्षेपक यंत्रणा स्तरावर मर्यादित राहिलेले नाही. आता आपण अवकाशात जीवन आणि विज्ञान यांचे भविष्य घडवत आहोत.” ते पुढे म्हणाले की ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला भारताची विज्ञानाची स्वप्ने सूक्ष्मगुरुत्वाकर्षणाच्या आघाडीवर नेत आहे.
भारताचे सशक्त वैज्ञानिक योगदान अधोरेखित करत केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी सांगितले की सात संपूर्ण स्वदेशी सूक्ष्मगुरुत्वाकर्षणसंबंधित प्रयोग ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्लाद्वारे आयएसएसमध्ये करण्यात येणार आहेत. हे प्रयोग संपूर्णतः भारतात संरचित आणि विकसित करण्यात आले आहेत. “अंतराळात करण्यात येणारे हे प्रयोग म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “आत्मनिर्भर भारत” आणि “विश्वबंधु भारत”च्या संकल्पनांचे मूर्त रूप आहेत. या प्रयोगांतून मिळणारे ज्ञान केवळ भारतासाठी लाभदायक आहे असे नव्हे तर ते जगातील वैज्ञानिक समुदाय आणि मानवतेला मिळालेला एक उपहार असेल,” डॉ.जितेंद्र सिंह ग्वाही देत म्हणाले.

हे अग्रणी प्रयत्न, आपल्या देशाची एक अंतराळ प्रवास करणारा देश ते अवकाश विज्ञान नवोन्मेषक देश अशी उत्क्रांत होत जाणारी भूमिका प्रतिध्वनित करत अंतराळ जैवविज्ञान क्षेत्रातील जागतिक स्तरावरील अग्रगण्य देश म्हणून भारताच्या उदयाचे प्रतिनिधित्व करतात. “भारत आता इतरांचे अनुसरण करणारा देश राहिला नसून, आम्ही ग्रहविषयक मोहिमांचे नेतृत्व करणारे झालो आहोत. हे प्रयोग अवकाशातील शाश्वत जीवनासाठी तसेच पृथ्वीवरील लवचिक परिसंस्थांसाठी नव्या आघाड्या खुल्या करून देईल,” ते म्हणाले.
***
S.Kakade/S.Chitnis/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2140018)
आगंतुक पटल : 18