संरक्षण मंत्रालय
संरक्षणमंत्र्यांनी तिन्ही सेनादलांमध्ये अधिक समन्वय सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने या तिन्ही सेनादलांना संयुक्त सूचना तसेच संयुक्त आदेश जारी करण्याचे अधिकार चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि लष्करी व्यवहार विभाग सचिवांना दिले
प्रविष्टि तिथि:
24 JUN 2025 8:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जून 2025
सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण आणि कायापालट करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलत, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही सेनादलांमध्ये अधिक समन्वय सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) आणि लष्करी व्यवहार विभाग (डीएमए) सचिवांकडे तिन्ही सेनादलांना संयुक्त सूचना तसेच संयुक्त आदेश जारी करण्याचे अधिकार दिले. दोन किंवा त्याहून अधिक सेनादलांशी संबंधित सूचना/ आदेश प्रत्येक सेना विभागाकडून स्वतंत्रपणे दिले जाण्याच्या पूर्वीच्या प्रणालीत यामुळे स्थित्यंतर घडून आले आहे.
‘मंजुरी, घोषणा आणि विविध संयुक्त सूचना तसेच संयुक्त आदेश’ यावर आधारलेला, 24 जून 2025 रोजी जारी झालेला पहिला संयुक्त आदेश प्रक्रिया सुव्यवस्थित करणे, अनावश्यकता काढून टाकणे आणि सेनादलांमध्ये आंतर-सेना सहकार्य वाढवणे यावर अधिक भर देतो. हा उपक्रम देशाच्या तिन्ही सेनादलांमध्ये सुधारित पारदर्शकता, समन्वय आणि प्रशासकीय कार्यक्षमता यांचा पाया रचत असून देशसेवेच्या कारणासाठी सशस्त्र दलांमध्ये ऐक्याचे दृढीकरण करत संयुक्तता आणि एकात्मता यांच्या नव्या युगाची सुरुवात होत असल्याचे देखील निदर्शक आहे.
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2139351)
आगंतुक पटल : 34