निती आयोग
नीती आयोगाच्या वतीने इनसाईट फ्यूचर फ्रंट या त्रैमासिक मालिकेतील अहवालाची तिसरी, भारताची डेटाची गरज: गुणवत्ता हाच मुख्य आधार (India’s Data Imperative: The Pivot Towards Quality) या विषयावरील आवृत्ती प्रकाशित.
Posted On:
24 JUN 2025 12:32PM by PIB Mumbai
नीती आयोगाने आज त्यांच्या अहवालाची तिसरी आवृत्ती प्रकाशित केली. भारताची डेटाची गरज: गुणवत्ता हाच मुख्य आधार (India’s Data Imperative: The Pivot Towards Quality) असे या अहवालाचे शीर्षक आहे. या अहवालातून डिजिटल प्रशासनाला बळकटी देण्यासाठी, लोकांचा विश्वास वाढवण्यासाठी तेच कार्यक्षम सेवा वितरणाच्या सुनिश्चितीतेसाठी मजबूत डेटा गुणवत्तेची तातडीची गरज अधोरेखित केली गेली आहे.
खराब डेटा गुणवत्तेमुळे निर्माण होणाऱ्या व्यापक आव्हानांचे गंभीर परीक्षणही या अहवालातून केले गेले आहे. याअंतर्गत डेटा गुणवत्तेच्या घटकांच्या मूल्यमापनाचे मोजपाम आणि त्याचा मागोवा घेत राहण्यासाठी डेटा गुणवत्ता गुणतालिका (Data-Quality Scorecard) आणि स्वयं-मूल्यांकन आणि मार्गदर्शक आराखडा विकसित करण्यासाठी डेटा गुणवत्ता परिपक्वता मार्गदर्शक आराखडा -क्वालिटी मॅच्युरिटी फ्रेमवर्क अशा व्यवहार्य, उपयुक्त आणि सुलभरितीने वापरता येतील साधनांची मांडणीही केली आहे.
या अहवालाच्या प्रकाशनावेळी, निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे सचिव डॉ. सौरभ गर्ग, आणि निती आयोगाच्या प्रतिष्ठित पाठ्यवृत्तीधारक देबजानी घोष यांच्यासह वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी भारताला आपल्या डेटा व्यवस्थापनाला कशारितीने अधिक बळकटी देता येई, याबद्दलचे आपले आपले विचार मांडले.
या कार्यक्रमाला विविध केंद्रीय मंत्रालये, विभाग, डोमेन तज्ञ, नीती आयोगाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
***
SushamaK/TusharP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2139184)