सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
खादी आणि ग्रामोद्योग आयोगातर्फे 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे नवी दिल्लीतील राजघाट येथील कार्यालयात आयोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे आज खादी आणि योग एक जागतिक चळवळ ठरली आहे: अध्यक्ष, खादी आयोग
Posted On:
21 JUN 2025 9:31PM by PIB Mumbai
मुंबई, 21 जून 2025
खादी आणि ग्रामोद्योग आयोग (केव्हीआयसी) आणि भारत सरकारचे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय यांच्यातर्फे 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नवी दिल्लीतील ऐतिहासिक राजघाट येथील मुख्यालयात आज 21 जून रोजी सामूहिक योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी खादी आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी आयोगाचे अधिकारी, कर्मचारी तसेच खादी क्षेत्राशी संबंधित मान्यवरांसोबत योगसाधना केली. या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना “एक पृथ्वी,एक आरोग्य” ही असून, ती पृथ्वी आणि आरोग्य यामधील सखोल परस्परसंबंध अधोरेखित करते.
कार्यक्रमादरम्यान बोलताना अध्यक्ष मनोज कुमार म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक प्रयत्नांमुळे आज खादी आणि योग जागतिक पातळीवर एक चळवळ बनली आहे. योग केवळ शरीर आणि मन निरोगी ठेवत नाही तर तो ‘स्वशुद्धी आणि स्वावलंबन’ या खादीच्या तत्वज्ञानाशीही निगडित आहे. पंतप्रधानांनी ‘मन की बात’ आणि इतर माध्यमातून योग आणि खादी यांचे लोकांपर्यंत प्रभावी प्रसारण करून भारताच्या सांस्कृतिक सामर्थ्याचा नवजागरण घडवले आहे.
YO86.jpeg)
ते पुढे म्हणाले की, आजच्या कार्यक्रमातून ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ या विचाराला आत्मसात करून स्वविश्वास आणि सामाजिक ऐक्याची भावना अधिक दृढ होते.
या योगाभ्यास कार्यक्रमात खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या राज्य कार्यालय, आरआर कार्यालय, प्रादेशिक कार्यालय, एमडीटीसी (नवी दिल्ली) आणि नवी दिल्लीतील केजीबी येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमानंतर अध्यक्ष मनोज कुमार यांनी स्वतः सर्व योग साधकांना अल्पोपाहार वाटून त्यांना प्रोत्साहित केले.
73ED.jpeg)
* * *
PIB Mumbai | M.Pange/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2138624)
अभ्यागत कक्ष : 18