पोलाद मंत्रालय
स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया ली. ने भारतीय नौदलाच्या आयएनएस अर्नाळा साठी आवश्यक विशेष स्टीलचा संपूर्ण पुरवठा केला
प्रविष्टि तिथि:
19 JUN 2025 12:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जून 2025
सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी स्टील उत्पादक महारत्न कंपनी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (सेल) ने संरक्षण क्षेत्रात देशाची स्वयंपूर्णता आणि आयातीला पर्याय म्हणून देशांतर्गत निर्मितीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. सेलने भारताच्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट (एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसी),'आयएनएस अर्नाळा' साठी आवश्यक विशेष स्टीलची गरज यशस्वीपणे पूर्ण केली. आयएनएस अर्नाळा काल, 18, जून 2025 रोजी भारतीय नौदलात दाखल झाली. सेलने गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स (जीआरएसई) द्वारे निर्मिती केली जाणाऱ्या इतर सात एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसी कॉर्व्हेट्ससाठी देखील विशेष स्टीलचा संपूर्ण पुरवठा केला आहे.
संरक्षण स्वदेशीकरणाच्या दिशेने भारताच्या वाटचालीत प्रमुख भागीदार म्हणून सेलने या प्रकल्पासाठी संपूर्ण विशेष स्टीलचा पुरवठा केला आहे. भारताच्या 'आत्मनिर्भर भारत' उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी आणि देशाचे आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत करण्याच्या सेलच्या प्रवासातला हा आणखी एक महत्वपूर्ण टप्पा आहे. या दिशेने, सेलने यापूर्वीही आयएनएस विक्रांत, आयएनएस विंध्यगिरी, आयएनएस नीलगिरी, आयएनएस सुरत आणि इतर उल्लेखनीय प्रकल्पांसाठी विशेष स्टीलचा पुरवठा केला होता.
Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2137637)
आगंतुक पटल : 9