पंचायती राज मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंचायती राज मंत्रालय आणि भाषिणी यांच्यात बहुभाषिक ई-गव्हर्नन्स सुलभतेसाठी सामंजस्य करार करणार

प्रविष्टि तिथि: 18 JUN 2025 4:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जून 2025

पंचायत राज आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि  माहिती - तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय भाषा अनुवाद अभियान (भाषिणी) यांच्यामध्‍ये 19 जून 2025 रोजी नवी दिल्लीच्या संविधान क्लब ऑफ इंडिया अ‍ॅनेक्स येथे सामंजस्य करार (MoU) केला जाणार आहे. या कराराच्या माध्यमातून एआय म्हणजेच कृत्रिम  प्रज्ञा  आधारित भाषा तंत्रज्ञानांचा उपयोग करून पंचायत राज प्रशासनात सर्वसमावेशकता वाढविणे आणि प्रवेश सुलभ करण्याचा हेतू आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय पंचायती राज आणि  मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय राज्यमंत्री प्रा. एस.पी. सिंग बघेल उपस्थितीत राहणार आहेत.  यावेळी पंचायती राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन तसेच इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.

या उपक्रमाचा उद्देश पंचायती राज मंत्रालयाच्या डिजिटल व्यासपीठांवर आणि जनसंपर्क उपक्रमांमध्ये बहुभाषिक प्रवेश वाढविणे हा आहे. यामुळे पंचायती राजविषयक उपक्रम, कार्यक्रम, संवाद आणि  थेट कार्यक्रमांमध्ये व्यापक लोकसहभाग सुनिश्चित केला जाईल. मंत्रालयाच्या सर्व डिजिटल व्यासपीठांना सुलभपणे बहुभाषिक बनविण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार असून, ग्रामीण भागातून निवडून आलेले प्रतिनिधी, अधिकारी आणि  नागरिकांना त्यांच्या मातृभाषेत योजना आणि प्रशासनात सुलभपणे सहभागी होता येईल.

या सामंजस्य करारामुळे पंचायती राज मंत्रालयाच्या प्रमुख पोर्टल्स आणि मंचांवर   भाषिक प्रवेशसुविधा वाढविण्यात येणार असून, कृत्रिम प्रज्ञेवर  आधारित सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधांचा वापर करून पंचायती राज संस्थांना सक्षम बनविण्यास मदत होणार आहे. यामुळे तळागाळातील सहभागी लोकशाही प्रक्रियेला बळकटी मिळेल. कार्यक्रमादरम्यान ई-ग्रामस्वराज या प्लॅटफॉर्ममध्ये भाषिणीच्या एकत्रीकरणाचा विशेष डिजिटल लॉन्च व्हिडीओ देखील प्रदर्शित केला जाणार आहे.

S.Bedekar/R.Dalekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2137297) आगंतुक पटल : 4
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Odia , Tamil , Malayalam