वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
एप्रिल-मे 2025 दरम्यान एकत्रित निर्यात (वाणिज्य आणि सेवा) 142.43 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी राहण्याचा अंदाज, एप्रिल-मे 2024 मधील 134.69 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या तुलनेत 5.75% ची वाढ अपेक्षित
मे 2025 मध्ये वाणिज्य निर्यात वाढीला चालना देणाऱ्या प्रमुख घटकांमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू,सेंद्रिय आणि बिगर-सेंद्रिय रसायने, औषधे आणि औषधनिर्माण, सागरी उत्पादने आणि तयार कपडे यांचा समावेश
Posted On:
16 JUN 2025 9:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जून 2025
मे 2025 मध्ये भारताची एकूण निर्यात (वाणिज्य आणि सेवा एकत्रित) 71.12 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी असल्याचा अंदाज, मे 2024 च्या तुलनेत 2.77 टक्के सकारात्मक वाढीची नोंद, मे 2025 मध्ये एकूण आयात (वाणिज्य आणि सेवा एकत्रित) 77.75 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी असल्याचा अंदाज , मे 2024 च्या तुलनेत (-) 1.02 टक्के नकारात्मक वाढीची नोंद
तक्ता 1: मे 2025 मधील व्यापार *
|
May 2025
(US$ Billion)
|
May 2024
(US$ Billion)
|
Merchandise
|
Exports
|
38.73
|
39.59
|
Imports
|
60.61
|
61.68
|
Services*
|
Exports
|
32.39
|
29.61
|
Imports
|
17.14
|
16.88
|
Total Trade
(Merchandise +Services) *
|
Exports
|
71.12
|
69.20
|
Imports
|
77.75
|
78.55
|
Trade Balance
|
-6.62
|
-9.35
|
टीप : भारतीय रिझर्व्ह बँकेने सेवा क्षेत्रासंबंधी जारी केलेली ताजी आकडेवारी एप्रिल 2025 शी संबंधित आहे. मे 2025 ची आकडेवारी हा एक अंदाज आहे, ज्यात आरबीआयच्या पुढील प्रकाशनाच्या आधारे दुरुस्ती केली जाईल.
आकृती 1 : मे 2025* दरम्यान एकूण व्यापार

·एप्रिल-मे 2025 या कालावधीत भारताची एकूण निर्यात 142.43 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी असल्याचा अंदाज, ज्यामध्ये 5.75 टक्के सकारात्मक वाढ झाली आहे. एप्रिल-मे 2025 या कालावधीत एकूण आयात 159.57 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी असल्याचा अंदाज , ज्यामध्ये 6.52 टक्के वाढ झाली आहे.
आकृती 2: एप्रिल-मे 2025 दरम्यान एकूण व्यापार

|
April-May 2025
(US$ Billion)
|
April-May 2024
(US$ Billion)
|
Merchandise
|
Exports
|
77.19
|
74.89
|
Imports
|
125.52
|
116.16
|
Services*
|
Exports
|
65.24
|
59.79
|
Imports
|
34.05
|
33.64
|
Total Trade
(Merchandise +Services) *
|
Exports
|
142.43
|
134.69
|
Imports
|
159.57
|
149.81
|
Trade Balance
|
-17.14
|
-15.12
|
वाणिज्य व्यापार
मे 2025 दरम्यान वाणिज्य मालाची 38.73 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी निर्यात झाली, जी मे 2024 मध्ये 39.59 अब्ज अमेरिकन डॉलर्स होती.
मे 2025 दरम्यान 60.61अब्ज अमेरिकन डॉलर्स वाणिज्य मालाची आयात झाली, जी मे 2024 मध्ये 61.68 अब्ज अमेरिकन डॉलर्स होती.
आकृती 3: मे 2025 दरम्यान वाणिज्य व्यापार

· एप्रिल-मे 2025 दरम्यान वाणिज्य मालाची निर्यात 77.19 अब्ज अमेरिकन डॉलर्स होती
. एप्रिल-मे 2025 दरम्यान वाणिज्य मालाची आयात 125.52 अब्ज अमेरिकन डॉलर्स होती
· एप्रिल-मे 2025 दरम्यान वाणिज्य मालाची तूट 48.33 अब्ज अमेरिकन डॉलर्स होती
सेवा व्यापार
· आकृती 7: मे 2025 दरम्यान सेवा व्यापार*

· एप्रिल-मे 2024 च्या तुलनेत एप्रिल-मे 2025 दरम्यान सेवा निर्यात 9.11 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे*
· मूल्यातील बदलाच्या बाबतीत, मे 2025 मध्ये सकारात्मक वाढ दर्शविणारी अव्वल 5 निर्यात ठिकाणे म्हणजे अमेरिका (16.93%), चीन (25.04%), ऑस्ट्रेलिया (35.36%), रशिया (48.11%) आणि जर्मनी (17.05%).
एप्रिल-मे 2024 च्या तुलनेत एप्रिल-मे 2025 मध्ये निर्यात स्त्रोतांच्या बाबतीत मूल्यातील बदलाच्या अनुषंगाने सकारात्मक वाढ दर्शविणारे आघाडीचे 5 देश म्हणजे अमेरिका (21.78%), संयुक्त अरब अमिराती (12.31%), ऑस्ट्रेलिया (50.76%), चीन पीआरपी (18.75%) आणि ओमान (40.94%).
मे 2024 च्या तुलनेत मे 2025 मध्ये आयात स्त्रोतांच्या बाबतीत मूल्यातील बदलाच्या अनुषंगाने वाढ दर्शविणारे आघाडीचे 5 देश म्हणजे चीन पीआरपी (21.61%), संयुक्त अरब अमिराती (27.64 %), नायजेरिया (89.56 %), हाँगकाँग (29.3 %) आणि जपान (24.32 %).
एप्रिल-मे 2024 च्या तुलनेत एप्रिल-मे 2025 मध्ये आयात स्त्रोतांच्या बाबतीत मूल्यातील बदलाच्या अनुषंगाने वाढ दर्शविणारे आघाडीचे 5 देश म्हणजे संयुक्त अरब अमिराती (52.08 %), चीन (24.23 %), अमेरिका (25.8 %), आयर्लंड (287.99 %) आणि हाँगकाँग (38.5%).
*त्वरित अंदाजांसाठी लिंक
N.Chitale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2136839)