संरक्षण मंत्रालय
राष्ट्रीय स्तरावर सायबर लवचिकता वाढवण्याच्या दृष्टीने संरक्षण सायबर एजन्सीकडून सज्जता उपक्रम
Posted On:
16 JUN 2025 3:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जून 2025
एकात्मिक संरक्षण कर्मचारी मुख्यालय यांच्या अखत्यारीतील संरक्षण सायबर एजन्सीने आयोजित केलेला 'सायबर सुरक्षा' हा एक व्यापक सायबर सुरक्षा सराव 16, जून 2025 रोजी सुरू झाला. 27, जून 2025 पर्यंत चालणारा हा विविध टप्प्यातील सराव राष्ट्रीय स्तरावर सायबर लवचिकता वाढवण्याच्या दिशेने एक सक्रिय पाऊल आहे आणि त्यात लक्ष्यित प्रशिक्षण सत्रे, मूल्यांकन आणि नेतृत्व कौशल्य वाढविण्यासाठी एक सहभागात्मक उपक्रम समाविष्ट आहे. राष्ट्रीय स्तरावरील एजन्सी आणि संरक्षण क्षेत्रातील हितधारक असे 100 हून अधिक जण या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.
हा सराव सध्याच्या जगातील सायबर धोके कसे असू शकतात याची प्रात्यक्षिके, सुरक्षित पद्धतींना बळकटी देण्यासाठी आणि वेगवान , खेळीमेळीच्या वातावरणात सहभागींच्या विश्लेषणात्मक आणि बचावात्मक सायबर कौशल्यांची चाचणी घेण्यासाठी तयार केला आहे. नेतृत्वासाठी मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी परिषद देखील 'सायबर सुरक्षा' मध्ये समाविष्ट केली आहे, ज्यामध्ये नेतृत्व भूमिकांसह तांत्रिक पैलूंची सांगड घातली आहे. मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी परिषदेमध्ये प्रख्यात वक्ते आपले विचार मांडणार असून हा एक उत्कंठावर्धक अनुभव असेल.
गतिमान व्यवहारिक आव्हानाच्या वातावरणासह रचनात्मक शिक्षणाचे संयोजन सहभागींना सायबर धोक्यांना सामोरे जाताना निर्णायकपणे कार्य करण्यास सक्षम बनवेल . सर्व स्तरांवर तयारीची सज्जता राखण्यासाठी आणि सुरक्षा-प्रथम संस्कृती जोपासण्यासाठी संरक्षण सायबर एजन्सी नियमितपणे असे सराव आयोजित करण्याची योजना आखत आहे.
N.Chitale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2136665)