पंतप्रधान कार्यालय
अहमदाबादमधील दुःखद विमान दुर्घटनेतील जखमींची पंतप्रधानांनी घेतली भेट
अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झाली आढावा बैठक
प्रविष्टि तिथि:
13 JUN 2025 3:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जून 2025
अहमदाबाद इथल्या दुःखद विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबादला भेट दिली. या दुर्घटनेत अनेक प्रवाश्यांनी जीव गमावला आहे. पीडित कुटुंबांसोबत असल्याची भावना व्यक्त करताना मोदी यांनी या घटनेत जखमी झालेल्यांची भेट घेतली, या अपघातात बचावलेल्या एकमेव व्यक्तीचाही यात समावेश होता. या कठीण काळात देशाच्या अतूट पाठिंब्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.
सध्या सुरु असलेल्या मदत कार्याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली अहमदाबाद विमानतळावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठकही झाली.
एक्स वरील स्वतंत्र पोस्टमध्ये मोदी यांनी लिहिले :
"अहमदाबादमधील दुःखद विमान अपघातात जखमी झालेल्यांची भेट घेतली, ज्यात एकमेव वाचलेली व्यक्ती देखील होती आणि त्यांना आश्वासन दिले की या कठीण काळात आम्ही त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत. त्यांनी लवकर बरे होण्यासाठी संपूर्ण देश प्रार्थना करत आहे."
"अहमदाबाद विमानतळावर उच्च अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.”
N.Chitale/N.Mathure/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2136143)
आगंतुक पटल : 6
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam