भूविज्ञान मंत्रालय
नॉर्वेचे आंतरराष्ट्रीय घडामोडी मंत्री ऑस्मुंड ग्रोव्हर ऑकरस्ट यांनी घेतली भारताचे भूविज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची भेट; जम्मू आणि काश्मीरमध्ये काही आठवड्यांपूर्वी घडलेल्या खेदजनक घटनांच्या पार्श्वभूमीवर भारताबरोबर दृढ ऐक्याची व्यक्त केली भावना
Posted On:
08 JUN 2025 7:07PM by PIB Mumbai
सागरी क्षेत्र नियोजन ( मरीन स्पॅटीअल प्लॅनिंग -एमएसपी) कार्यक्रमाच्या निमित्ताने एका महत्त्वपूर्ण राजनैतिक संवादात, नॉर्वेचे आंतरराष्ट्रीय विकास मंत्री ऑस्मुंड ग्रोव्हर ऑकरस्ट यांनी भारताचे भूविज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची भेट घेतली. जम्मू आणि काश्मीरमध्ये काही आठवड्यांपूर्वी घडलेल्या खेदजनक घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतासोबत असल्याची भावना व्यक्त केली.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी नॉर्वेच्या या समर्थनाबद्दल आभार मानले. त्यावर उत्तर देताना मंत्री ऑकरस्ट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नॉर्वे दौऱ्याची ते उत्सुकतेने वाट पाहत असल्याचे सांगितले.
ही भेट परस्पर सन्मान आणि विश्वास वाढवणारी एक सकारात्मक पायरी ठरली. डॉ. जितेंद्र सिंह यांनी नॉर्वेच्या नेतृत्वाचे आणि जनतेचे भारताच्या जागतिक भूमिकेस दिलेल्या सातत्यपूर्ण पाठिंब्याबद्दल आभार मानले.
याआधी, मोनॅकोमधील क्वाई पोर्ट हर्क्युल येथे आगमनानंतर, नॉर्वेच्या परराष्ट्र मंत्रालयातील महासागर विभागाचे संचालक ट्रॉन्ड गॅब्रिएल्सन आणि वरिष्ठ सल्लागार एव्हिंड एस. होम्मे यांनी डॉ. जितेंद्र सिंह यांचे स्वागत केले.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी स्टॅटस्त्राड लेहमकुही या ऐतिहासिक संशोधन नौकेत प्रवेश केल्यानंतर, नॉर्वेचे आंतरराष्ट्रीय घडामोडी मंत्री ऑस्मुंड ऑकरस्ट आणि जहाजाच्या कॅप्टननी त्यांचे स्वागत केले आणि द्विपक्षीय संवादाची सुरूवात सौहार्दपूर्ण वातावरणात झाली.
या चर्चेत दोन्ही मंत्र्यांनी महासागर व्यवस्थापन व सागरी स्थानिक नियोजन क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्याची वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली. आर्क्टिक संशोधन, ध्रुवीय विज्ञान मोहिमा, किनारी भागातील आपत्ती प्रतिकारक्षमता व सागरी माहिती सामायिकरण यांवरही सहकार्य वाढवण्यावर यावेळी चर्चा झाली.
***
S.Kane/N.Gaikwad/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2135029)