उपराष्ट्रपती कार्यालय
राजकीय पक्षांनी राजकीय आवेश कमी राखायला हवा; चर्चा म्हणजे वाद घालणे नव्हे: उपराष्ट्रपती
कॉर्पोरेट क्षेत्राने त्यांना झालेला फायदा कृषी क्षेत्राशी विभागून घेण्याची ही वेळ: उपराष्ट्रपतींचे प्रतिपादन
उपराष्ट्रपतींनी बेंगळूरूमधील उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती आणि उद्योजकांशी साधला संवाद
प्रविष्टि तिथि:
07 JUN 2025 8:38PM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज म्हणाले, “देशातील राजकीय पक्षांना राजकीय आवेश कमी करावा लागेल. राजकीय पक्षांमधील संवाद म्हणजे वाद घालणे नव्हे – संवाद हा सुखद असला पाहिजे. मित्रांनो, संवाद आणि संभाषण यांच्याद्वारे लोकशाहीची व्याख्या केली जाते.
ते पुढे म्हणाले, “भारत हा एक समृद्ध संघराज्य असलेला समाज आहे त्यामुळे येथे केंद्र आणि राज्य यांच्यात समन्वय असला पाहिजे. नेते आणि राजकीय पक्ष यांच्यातील संवाद महत्त्वाचा आहे – संवादाचा अभाव आपल्या राष्ट्रीय मानसिकतेसाठी चांगले लक्षण नव्हे.”
बेंगळूरूमधील उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती आणि उद्योजकांशी संवाद साधताना उपराष्ट्रपती म्हणाले, “राष्ट्रीय सुरक्षेचे विषय, आपल्या राष्ट्रीयत्वाशी संबंधित मुद्दे आणि आपल्या विकासाशी जोडलेले घटक यांच्याकडे पक्षपातीपणाने नव्हे तर राष्ट्रीय दृष्टीकोनातून पाहिले गेले पाहिजे.
औद्योगिक क्षेत्रातील पद्धतींवर भाष्य करत त्यांनी एक तीक्ष्ण निरीक्षण नोंदवले, ते म्हणाले, “उद्योग क्षेत्रात कार्यरत लोकांचे ताळेबंदाने समाधान होते मात्र राजकारणात तसे होत नाही.
कॉर्पोरेट क्षेत्राने त्यांना झालेला फायदा कृषी क्षेत्राशी विभागून घ्यावा असे आवाहन करत उपराष्ट्रपती धनखड म्हणाले, “कॉर्पोरेट क्षेत्राने त्यांना झालेला फायदा कृषी क्षेत्राशी सामायिक करुन घेण्याची ही वेळ आहे. संशोधन अथवा शेतजमीन यांच्यातील तुमची गुंतवणूक म्हणजे काही दानशूरता नव्हे – ही एक फायदेशीर गुंतवणूक आहे.”
भारताच्या विकासाच्या भविष्याबाबत बोलताना धनखड यांनी संशोधन आणि नवोन्मेष यांची भूमिका अधोरेखित केली. ते म्हणाले, “आपण सर्वोच्च दर्जाचे संशोधन हाती घेतले पाहिजे.”
राष्ट्रीय सुरक्षेत उद्योगांच्या भूमिकेच्या उत्क्रांतीवर अधिक भर देत त्यांनी सांगितले, “एके काळी उद्योगांतून केवळ शस्त्रागारांचे उत्पादन होत असे. आता त्यांनी तंत्रज्ञानात आघाडी घ्यायला हवी. संशोधन हा दीर्घकालीन विकासाचा कणा आहे.”
***
N.Chitale/S.Chitnis/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2134940)
आगंतुक पटल : 21