कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेचे अध्यक्षपद भारताकडे

Posted On: 04 JUN 2025 5:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 जून 2025

भारत 1998 पासून प्रशासकीय सुधारणा विभागाद्वारे  आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेचा सदस्य देश आहे. आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्था ही 31 सदस्य देशांची, 20 राष्ट्रीय विभागांची आणि 15 शैक्षणिक संशोधन केंद्रे असलेली एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. ही संस्था सार्वजनिक प्रशासनावरील वैज्ञानिक संशोधनासाठी संयुक्तपणे कार्य करते. या संस्थेच्या प्रमुख सदस्य देशांमध्ये भारत, जपान, चीन, जर्मनी, इटली, कोरिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, स्वित्झर्लंड, मेक्सिको, स्पेन, कतार, मोरोक्को, इंडोनेशिया या देशांचा  समावेश आहे.

आयआयएएसचे  संयुक्त राष्ट्रांशी जवळचे कार्यकारी संबंध असून  संयुक्त राष्ट्रांच्या सार्वजनिक प्रशासनावरील तज्ञांच्या समितीत (सीईपीए) आणि संयुक्त राष्ट्र सार्वजनिक प्रशासन नेटवर्क (यूएनपीएएन) मध्ये भाग ही संस्था सहभागी होते. आयआयएएस ही संयुक्त राष्ट्र संघाशी औपचारिकपणे संलग्न संस्था नसली तरी, ती सार्वजनिक प्रशासनातील संयुक्त राष्ट्रांच्या कामात सक्रियपणे सहभागी होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये डीएआरपीजी सचिव श्री. व्ही. श्रीनिवास यांचे नाव भारताचे उमेदवार म्हणून आयआयएएसच्या 2025-2028 अध्यक्षपदासाठी  नामांकित केले होते.

नागरिकांच्या डिजिटल सक्षमीकरणावर आणि संस्थांच्या डिजिटल परिवर्तनावर लक्ष केंद्रित करून पुढील पिढीतील प्रशासकीय सुधारणांचे दस्तऐवजीकरण करत आयआयएएसचे भारतीय अध्यक्षपद पंतप्रधान मोदींच्या "कमाल प्रशासन - किमान सरकार"(मॅक्झिमम गव्हर्नन्स,मिनिमम गव्हरनमेंट)" या दृष्टिकोनाला अग्रेषित करेल.भारतीय अध्यक्षपद एकता आणि समावेशकता यावर लक्ष केंद्रित करेल.


S.Tupe/S.Patgaonkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2133849)