शिक्षण मंत्रालय
शिक्षण मंत्रालयाच्या वतीने ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन जनजागृती प्रश्नमंजूषा 2025; ‘मायगॉव्ह’ मंचावर 12 भाषांमध्ये सर्वांसाठी उपलब्ध
प्रविष्टि तिथि:
03 JUN 2025 5:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 जून 2025
तंबाखूविरोधी लढा हा केवळ आरोग्याचा मुद्दा नाही; तर देशभरातील लाखो युवकांच्या आयुष्याशी संबंधित हे एक सामाजिक आणि शैक्षणिक अभियान आहे. जागतिक तंबाखू विरोधी दिन 2025 च्या निमित्ताने शिक्षण मंत्रालयाने ‘मायगॉव्ह’च्या सहकार्याने ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन जनजागृती प्रश्नमंजूषा 2025’ सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि नागरिकांना तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी माहिती देणे आणि योग्य निर्णय घेण्यासाठी त्यांना सक्षम करणे असा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या प्रश्नमंजुषेचे वैशिष्ट्य म्हणजे ती 12 भाषांमध्ये उपलब्ध आहे. इंग्रजी, हिंदी, असमी, बंगाली, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम, मराठी, उडिया आणि पंजाबी यापैकी कोणत्याही भाषेत स्पर्धकांना भाग घेता येईल. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 सह सुसंगत असे हे पाऊल आहे. यामुळे स्थानिक आणि प्रादेशिक भाषांमध्ये शिक्षण, जनजागृतीला प्रोत्साहन मिळेल. भाषेच्या अडथळा आता संपुष्टात आल्यामुळे शिकण्याची इच्छा असलेली व्यक्ती मागे राहात नाही.
या प्रश्नमंजूषेत सहभागी होणे सोपे असून ही सर्वांसाठी खुली आहे. https://quiz.mygov.in/quiz/world-no-tobacco-day-awareness-quiz/ या संकेतस्थळावर जाऊन ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन जनजागृती प्रश्नमंजूषा 2025’ हा पर्याय निवडा, आपल्या पसंतीची भाषा निवडा आणि मोबाईल क्रमांक किंवा ईमेलच्या सहाय्याने नोंदणी करून प्रश्नमंजुषा सुरू करा. ही प्रश्नमंजूषा विनामूल्य, सुलभ आणि माहितीपूर्ण आहे. प्रत्येक सहभागीला मायगॉव्हकडून डिजिटल प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
चला, आपण सगळे मिळून हा उपक्रम केवळ एक डिजिटल उपक्रम न ठेवता, एक देशव्यापी चळवळ बनवूया. प्रत्येक शाळा, प्रत्येक शिक्षक, प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक भाषा महत्त्वाची आहे. जागरूकता समजूतदारपणातून येते, आणि समजून घेण्याची सुरुवात भाषेपासून होते.
* * *
S.Bedekar/R.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2133588)
आगंतुक पटल : 13