युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
‘फिट इंडिया संडेज ऑन सायकल’ची 25 वी आवृत्ती विशेष तिरंगा रॅली म्हणून साजरी केली जाणार
प्रविष्टि तिथि:
31 MAY 2025 1:21PM by PIB Mumbai
फिट इंडिया संडेज ऑन सायकल उपक्रमाची 25 वी आवृत्ती,जी तिरंगा रॅली म्हणूनही संबोधली जाते, तिचे आयोजन देशभरात रविवार 1 जून रोजी केले जात आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय हे राष्ट्रीय राजधानीत मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियममध्ये आयोजित विशेष आवृत्तीचे नेतृत्व करतील.
3 जून रोजी जागतिक सायकल दिन साजरा केला जात असल्याने, रविवारचा कार्यक्रम हा फिटनेसमधील सायकलिंगच्या मोठ्या भूमिकेचा केवळ संदेश देणार नाही तर हे आयोजन भारताच्या सशस्त्र दलांना सामूहिक अभिवादन असेल. राष्ट्रीय राजधानीत 1200 हून अधिक सायकलस्वार या रॅलीत सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. रविवारी त्याच वेळी, देशभरातील 2,000 हून अधिक ठिकाणी रॅलीचे आयोजन केले जाणार आहे.
या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, ओदिशाचे राज्यपाल डॉ. हरी बाबू कंभमपती भुवनेश्वरमध्ये तिरंगा रॅलीला हिरवा झेंडा दाखवतील. यातून या उपक्रमाचे संपूर्ण भारतभर महत्त्व अधोरेखित होईल. दिल्लीत आयोजित रॅलीमध्ये डॉ. मनसुख मांडविया यांच्यासोबत ऑलिंपिक पदक विजेता योगेश्वर दत्त, आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर सरिता मोर, बॉलिवूड अभिनेता शर्वरी आणि माजी क्रिकेटपटू साबा करीम यांच्यासह क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती सहभागी होतील. डॉ. मांडविया यांच्या उपस्थितीत काही महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या प्रारंभासह अनेक उपक्रमांचे नियोजन केले आहे.
तंदुरुस्ती सुलभ, समावेशक आणि देशभक्तीपर बनवण्याच्या फिट इंडिया चळवळीच्या प्रयत्नांमध्ये तिरंगा रॅली एक सर्वोच्च क्षण असेल. देशभरातील रस्ते खुल्या सायकलिंग ट्रॅकमध्ये बदलत आहेत. अनेक कुटुंबे , विद्यार्थी, प्रभावशाली व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक या रॅलीत सहभागी होणार असून या उपक्रमामुळे देशातील विविध समुदायात आणि निसर्गरम्य ठिकाणी आरोग्य संस्कृती निर्माण होत आहे.
***
S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2132974)
आगंतुक पटल : 13