लोकसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना संसद सदस्यांनी वाहिली आदरांजली

Posted On: 28 MAY 2025 9:28PM by PIB Mumbai

नवी ‍‍दिल्ली, 28 मे 2025

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आज संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण तसेच रसायने आणि खते मंत्री जे. पी. नड्डा आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी आज आदरांजली वाहिली.

संसदचे आजी आणि माजी संसद सदस्य, लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंह, राज्यसभेचे महासचिव पी. सी. मोदी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, ज्यांना वीर सावरकर म्हणून ओळखले जाते, त्यांचा जन्म 28 मे 1883 रोजी झाला. सावरकर हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक उत्तुंग व्यक्तिमत्व असून एक क्रांतिकारक, कवी, लेखक आणि एक दूरदर्शी समाजसुधारक देखील होते. 20 व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटीश वसाहतवादी राजवटीविरुद्ध भारतीयांच्या मनात प्रतिकाराची भावना जागृत करण्यात वीर सावरकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. स्वातंत्र्याच्या उद्देशाने तरुण भारतीयांना एकत्र आणण्यासाठी आणि संघटीत करण्यासाठी त्यांनी क्रांतिकारी संघटनांची स्थापना केली. अंदमान आणि निकोबार बेटांवरच्या कुप्रसिद्ध सेल्युलर तुरुंगात असताना त्यांचे अदम्य धैर्य ठळकपणे दिसून आले. या तुरुंगात वीर सावरकर यांनी अढळ दृढनिश्चयाने प्रचंड यातना सहन केल्या.

आपल्या क्रांतिकारी उत्साहापलीकडे वीर सावरकर सामाजिक सुधारणा आणि आधुनिकीकरणाचे कट्टर समर्थक होते. बुद्धिवाद, सामाजिक दुष्कर्मांचे उच्चाटन आणि प्रगतीशील भारतीय समाजाला चालना देण्याच्या आदर्शांना सावरकरांनी नेहमीच पाठिंबा दिला. वीर सावरकरांच्या विचारांचा वारसा त्यांच्या लेखनातून, राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी त्यांच्या अथक प्रयत्नातून आणि मजबूत, स्वावलंबी भारतासाठीच्या त्यांच्या दृष्टिकोनातून टिकून आहे. सावरकरांचे जीवन देशभक्ती आणि सुधारणांचा एक शक्तिशाली दाखला आहे.

संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहात लावलेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे चित्र चंद्रकला कुमार कदम यांनी रंगवले होते आणि 26 फेब्रुवारी 2003 रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी या चित्रांचे अधिकृतरित्या अनावरण केले होते.

S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2132191)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu