संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी उत्तर आणि पश्चिम कमांडच्या मुख्यालयांना दिली भेट; ऑपरेशन सिंदूरनंतरच्या स्थितीचा घेतला धोरणात्मक आढावा आणि कार्याचे केले मूल्यांकन


जनरल अनिल चौहान यांनी आव्हानात्मक परिस्थितीत समग्र समन्वयाची आणि परिचालनात्मक कामगिरी वेळेवर फत्ते करण्याची केली प्रशंसा

Posted On: 25 MAY 2025 7:40PM by PIB Mumbai

 

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी 25 मे 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर येथील भारतीय सैन्याच्या उत्तर कमांड आणि हरियाणातील चंडीमंदिर मिलिटरी स्टेशन येथील पश्चिम कमांडला भेट दिली. जनरल चौहान यांनी लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा आणि लेफ्टनंट जनरल मनोज कुमार कटियार तसेच ऑपरेशन सिंदूरच्या नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये सक्रियरित्या सहभागी असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या भेटीदरम्यान त्यांनी उत्तर आणि पश्चिम भागातील स्थितीचा धोरणात्मक आढावा घेतला आणि कार्य मूल्यांकन केले.

जनरल चौहान यांना उधमपूर येथे ऑपरेशन सिंदूर दरम्यान दहशतवाद्याचे जाळे भंग करण्यात तसेच दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या शत्रूच्या मालमत्तेचे निष्क्रियीकरण करण्यात उत्तर कमांडला मिळालेल्या यशाबद्दल माहिती देण्यात आली. सीमावर्ती भागातील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी उत्तर कमांडच्या सैन्याने केलेल्या प्रयत्नांबद्दलही त्यांना माहिती देण्यात आली.

उत्तर सैन्याच्या कमांडरने उत्तर सैन्याच्या सततच्या ऑपरेशनल आणि लॉजिस्टिक्स तयारीबद्दल माहिती दिली आणि जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू करताना, सीमांचे रक्षण करण्यासाठी सीडीएसची वचनबद्धता असल्याचे आश्वासन दिले.

जनरल चौहान यांना चंडीमंदिर येथे, पश्चिम सैन्याच्या कमांडरने ऑपरेशन सिंदूर दरम्यान दिलेल्या कायनेटिक आणि नॉन कायनेटिक दंडात्मक प्रतिसादाबद्दल व्यापक माहिती देण्यात आली. पश्चिम सीमेवरील प्रचलित सुरक्षा परिस्थिती अधोरेखित करताना कार्य वातावरण, संरक्षण तयारी आणि ऑपरेशनच्या प्रमुख परिणामांचा तपशीलवार आढावा त्यांच्यासमोर मांडण्यात आला.

तांत्रिक पुरवठा आणि वाढीव लॉजिस्टिक्स क्षमता, उच्च ऑपरेशनल कार्यक्षमता, रिअल-टाइम परिस्थितीजन्य जागरूकता आणि पश्चिमी सैन्याच्या लष्करी क्षमतेला बळकटी देण्यावरील माहिती देखील यावेळी अधोरेखित करण्यात आली. राष्ट्रीय कार्यासाठी सेवा बजावणाऱ्यांच्या कल्याणाप्रति भारतीय सैन्याची दृढ वचनबद्धता प्रतिबिंबित करणाऱ्या सेवारत आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या माजी सैनिकांची काळजी आणि वैद्यकीय सुविधांबद्दल जनरल चौहान यांना माहिती देण्यात आली.

आव्हानात्मक परिस्थितीत महत्त्वाची कामगिरी वेळेवर फत्ते केल्याबद्दल सीडीएस जनरल चौहान यांनी त्यांचे कौतुक केले. वाढत्या धोक्यांना तोंड देण्यासाठी सर्व सेवांमध्ये निरंतर दक्षता, संयुक्तता आणि समन्वयाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. शत्रूने लक्ष्य केलेल्या नागरिकांच्या पुनर्वसनात मदतीचा हात देण्याचे आवाहन त्यांनी केले.

***

S.Patil/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2131224)
Read this release in: English , Hindi