पंचायती राज मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंचायत प्रगती निर्देशांक - पीएआय 2.0 च्या अंमलबजावणीसाठी नवी दिल्लीत दोन दिवसीय राष्ट्रीय लेखन कार्यशाळेचे आयोजन

Posted On: 24 MAY 2025 5:27PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 मे 2025

 

पंचायती राज मंत्रालयातर्फे नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात येत्या 26 आणि 27 मे 2025 रोजी पंचायत प्रगती निर्देशांक - पीएआय आवृत्ती 2.0 च्या अंमलबजावणीबाबत राष्ट्रीय लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही कार्यशाळा, आर्थिक वर्ष 2023-24 साठी PAI 2.0 च्या राष्ट्रीय अंमलबजावणीचे प्रतीक आहे. पंचायती राज संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागात समग्र, समावेशक आणि शाश्वत विकास साध्य करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर डेटा-आधारित देखरेख आणि नियोजनासाठी क्षमता निर्माण करणे, हे या कार्यशाळेचे उद्दिष्ट आहे.

दोन दिवसांच्या या राष्ट्रीय कार्यशाळेमध्ये आर्थिक वर्ष 2023-24 साठी स्थानिक निर्देशक प्रणाली (LIF) पुस्तिकेचे प्रकाशन, तसेच अद्ययावत PAI 2.0 पोर्टल आणि SOP चे अनावरण केले जाईल. तांत्रिक सत्रांमध्ये PAI 1.0 आधारभूत अहवालाची रूपरेषा, PAI 2.0 ची चौकट आणि कार्यपद्धती तसेच पोर्टलच्या कार्यक्षमतेचे प्रात्यक्षिक यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

पोर्टल कॉन्फिगरेशन, डेटा एंट्री, व्हॅलिडेशन/प्रमाणीकरण आणि नियोजनात PAI आउटपुटचा वापर समजून घेण्यासाठी देशभरातील गट या कार्यशाळेत प्रत्यक्ष सहभागी होतील. दुसऱ्या दिवशी, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे संघ आपले अनुभव सादर करतील, PAI 1.0 मधील अंमलबजावणीची अंतर्दृष्टी सामायिक करतील आणि ग्रामपंचायत विकास योजना (GPDPs) बळकट करण्यासाठी PAI 2.0 चा वापर कसा करायचा, याचे सादरीकरण करतील. या कार्यशाळेत 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधले प्रतिनिधी सहभागी होतील. पंचायती राज, आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकास, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी, महिला आणि बाल विकास विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच नीती आयोग, एमओएसपीआय, राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (एनआयसी) मधील तांत्रिक पथके आणि युनिसेफ, यूएनएफपीए, टीआरआय आणि पिरामल फाउंडेशन सारखे ज्ञान भागीदारही या कार्यशाळेत सहभागी होतील.

भाषिक समावेशकता आणि राष्ट्रीय पोहोच वाढवण्यासाठी, हा कार्यक्रम मराठीबरोबरच आसामी, बंगाली, इंग्रजी, गुजराती, कन्नड, मल्याळम, ओडिया, पंजाबी, तमिळ आणि तेलगू अशा अकरा भारतीय भाषांमध्ये थेट प्रक्षेपित केला जाईल.

पंचायत प्रगती निर्देशांक (पीएआय) 2.0 च्या अंमलबजावणीसाठी नवी दिल्लीत दोन दिवसीय राष्ट्रीय लेखन कार्यशाळेचे / राईटशॉपचे आयोजन

पंचायती राज मंत्रालय 26-27 मे 2025 रोजी नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात पंचायत प्रगती निर्देशांक (पीएआय) आवृत्ती 2.0 वर दोन दिवसीय राष्ट्रीय लेखन कार्यशाळेचे आयोजन करत आहे.

राईटशॉप हे आर्थिक वर्ष 2023-24 साठी PAI 2.0 च्या राष्ट्रीय अंमलबजावणीचे प्रतीक आहे आणि पंचायती राज संस्थांद्वारे ग्रामीण भागात समग्र, समावेशक आणि शाश्वत विकास साध्य करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर डेटा-आधारित देखरेख आणि नियोजनासाठी क्षमता निर्माण करण्याचे याचे उद्दिष्ट आहे.

दोन दिवसांच्या या राष्ट्रीय राईटशॉप मध्ये आर्थिक वर्ष 2023-24  साठी स्थानिक निर्देशक प्रणाली  (LIF) पुस्तिकेचे प्रकाशन आणि आद्ययावत PAI 2.0 पोर्टल आणि SOP चे लाँचिंग यांचा समावेश असेल. तांत्रिक सत्रांमध्ये PAI 1.0 आधारभूत अहवालाची रूपरेषा, PAI 2.0 ची चौकट आणि कार्यपद्धती आणि पोर्टलच्या कार्यक्षमतेचे प्रात्यक्षिक यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

सहभागी पोर्टल कॉन्फिगरेशन, डेटा एंट्री, व्हॅलिडेशन/प्रमाणीकरण आणि नियोजनात PAI आउटपुटचा वापर यासाठी प्रत्यक्ष गट कार्यात देखील सहभागी होतील. दुसऱ्या दिवशी, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे संघ त्यांचे अनुभव सादर करतील, PAI 1.0 मधील अंमलबजावणीची अंतर्दृष्टी सामायिक करतील आणि ग्रामपंचायत विकास योजना (GPDPs) बळकट करण्यासाठी PAI 2.0 चा वापर कसा करायचा याचे ते सादरीकरण करतील. या राईटशॉपमध्ये 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे लोक सहभागी होतील, ज्यात पंचायती राज, आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकास, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी, महिला आणि बाल विकास विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि नीती आयोग, एमओएसपीआय, राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (एनआयसी) मधील तांत्रिक पथके आणि युनिसेफ, यूएनएफपीए, टीआरआय आणि पिरामल फाउंडेशन सारख्या ज्ञान भागीदारांचा समावेश असेल.

भाषिक समावेशकता आणि राष्ट्रीय पोहोच वाढवण्यासाठी, हा कार्यक्रम अकरा भारतीय भाषांमध्ये थेट प्रक्षेपित केला जाईल, यात : आसामी, बंगाली, इंग्रजी, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ आणि तेलगू या भाषांचा समावेश असेल. 

 

* * *

M.Pange/H.Kulkarni/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2130953)