उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्र्पतींनी प्राचीन ग्रंथांचे पुराव्यावर आधारित प्रमाणीकरण, डिजिटलीकरण, अनुवाद आणि बहु -विषयक अध्ययन यावर दिला भर


पर्यायी औषधपद्धतीवर लक्ष केंद्रित करा- उपराष्ट्रपती

उपराष्ट्र्पतींनी जामनगरमधील जागतिक पारंपरिक औषध केंद्राची केली प्रशंसा

भारतीय किंवा प्राचीन कमी प्रगत असते या समजुतीला आधुनिक भारतात अजिबात स्थान नाही- उपराष्ट्रपती

उपराष्ट्रपतींच्या हस्ते गोव्यातील राज भवनात “चरक- आयुर्वेदाचे जनक” आणि “सुश्रुत- शस्त्रक्रियांचे जनक” यांच्या प्रतिमांचे अनावरण

Posted On: 22 MAY 2025 12:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 मे 2025

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज पर्यायी औषधपद्धतीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन करून आपल्या प्राचीन ग्रंथांना समकालीन आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिक सुलभ तसेच समर्पक ठरतील असे रूप देण्यासाठी त्यांचे पुराव्यावर आधारित प्रमाणीकरण करण्याचे आवाहन केले. गोव्यात राजभवनात आयोजित कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, “आपण एक वेगळे राष्ट्र आहोत. आपण आपल्या मुळांचा नव्याने शोध घेत आहोत. आणि आपण आपल्या मुळांशी अधिक घट्टपणे रुजवून घेऊ. भारत हा पर्यायी औषधोपचार पद्धतीचा पुरस्कर्ता असल्यामुळे मी पर्यायी औषध पद्धतीवर मोठ्या प्रमाणात भर देतो. ते आजही व्यापक प्रमाणात प्रचलित आहेत. आपल्या प्राचीन ग्रंथांना ग्रंथसंग्रहालयापुरते सीमित  ठेवले जाऊ नये. ते संग्रहालयाची शोभा वाढवण्यासाठी नाहीत. या ग्रंथांतील ज्ञान मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले पाहिजे. .आधुनिक वैज्ञानिक साधनांचा  वापर करून आपण संशोधन, नवोन्मेष तसेच पुनर्व्याख्येच्या माध्यमातून कालातीत संकल्पनांना संजीवनी देऊया.  हा मौलिक खजिना प्राप्त करण्यासाठी आणि समकालीन आव्हानांना तोंड देण्यासाठी समर्पक त्यातील ज्ञानाचा वापर करण्यासाठी पुराव्यावर आधारित प्रमाणीकरण, डिजिटलीकरण, अनुवाद  तसेच बहु -विषयक अध्ययन अशा विविध मार्गांचा पाठपुरावा करूया. गुजरातमध्ये जामनगर येथे जागतिक पारंपरिक औषध  केंद्राची स्थापना करून जागतिक आरोग्य संघटनेने या औषधपद्धतीला मान्यता दिली याचा मला अत्यंत आनंद आहे. आयुर्वेदासारख्या आपल्या प्रणालींच्या सार्वत्रिक प्रासंगिकतेला  मोठी  मान्यता मिळाली आहे!”

“आपल्याला आपल्या इतिहासातील आपले वेद, आपली उपनिषदे, आपली पुराणे यांच्यात पुन्हा डोकावण्याची आणि आपल्या मुलांना त्यांच्या जन्मापासूनच आपल्या संस्कृतीच्या सखोल ज्ञानाबद्दल सांगण्याची वेळ आता आली आहे,”असे ते पुढे म्हणाले.

प्रतिमांचे  अनावरण केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना उपराष्ट्रपती धनखड म्हणाले, “आपण आज ज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या चरक ऋषींचा सन्मान करत आहोत. चरक ऋषी कुषाण  साम्राज्याचे राजवैद्य होते. चरक यांना औषधांचे जनक म्हणले जाते आणि आयुर्वेदाची मुलभूत संहिता असलेल्या  चरक संहितेचे ते लेखक आहेत. दुसरे ऋषी म्हणजे सुश्रुत, त्यावेळच्या शस्त्रक्रिया शास्त्राचे जनक. मला त्यांच्या काळातील शल्यचिकित्सा  उपकरणांची चित्रे पाहण्याची   संधी  मिळाली.   त्या काळातील शस्त्रक्रियांची उपकरणे किती आधुनिक होती ते  आपण नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे.

सुश्रुत हे धन्वंतरीचे शिष्य होते, जे स्वतः प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य होते.  चरक आणि सुश्रुत यांचे जीवन आणि कार्य सर्वांसाठी, विशेषतः आपल्या प्रभावशाली मनांसाठी प्रेरणा आणि प्रोत्साहनाचा  स्रोत बनवूया. "

आपल्या प्राचीन ज्ञानाचा अभिमान बाळगण्याची गरज आहे असे नमूद करत  धनखड यांनी अधोरेखित केले, "मी एका विशिष्ट सांस्कृतिक वैशिष्ट्याकडे  देखील लक्ष वेधायचे आहे.  हा आपला  सांस्कृतिक स्वभाव  आहे. आपल्या समाजातील काही घटकांमध्ये एक प्रवृत्ती  आहे. भारतीय किंवा प्राचीन काहीही कमी प्रगत आहे. आधुनिक भारतात , आपल्या काळात या मानसिकतेला स्थान नाही.  जगाला आपले महत्त्व कळले आहे. आपणही  ते लक्षात घेण्याची वेळ आली आहे. पश्चिम आधुनिक आणि प्रगतीशील आहे असे मानणे  आपल्याला परवडणारे नाही. सध्याची परिस्थिती पहा आणि तुम्हाला आढळेल की आपण त्यापासून खूप दूर गेलो आहोत.  भारत केंद्र बनले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मत  चुकीचे नव्हते  , त्यांनी म्हटले होते  की, आपण उत्कृष्टतेचे केंद्र आहोत. आपण सुवर्ण संधींचे केंद्र आहोत, गुंतवणुकीसाठी संधी आहोत. ही परिस्थिती असल्याने, आपण भारतीय परिस्थितीवर विश्वास ठेवूया. पश्चिमी देश आपल्या खूप मागे आहेत . ते आपल्याकडून शिकत आहेत."

प्राचीन संस्कृतीच्या ज्ञानावर भर देत उपराष्ट्रपती म्हणाले, “आपल्या ज्ञानाच्या खजिन्याबद्दल आपण अधिक जाणून घेतले तर सर्व पाश्चिमात्य देश चकित होतील. .... चरक, सुश्रुत, , जीवक, प्रसिद्ध आयुर्वेदिक वैद्य. आणि ते बुद्धांचे खासगी  डॉक्टर होते..... गणित आणि खगोलशास्त्राचा विचार केला तर, आर्यभट्ट, आपण आपल्या उपग्रहांना त्यांचे  नाव दिले आहे, एक महान नाव, आणि त्या काळात आपल्याकडे बौद्धायन हे महान गणितज्ञ होते आणि आपल्याकडे  चंद्रगुप्त विक्रमादित्य यांच्या काळात वराहमिहिर होते ....त्या काळात उज्जैन येथे त्यांची एक वेधशाळा होती.”

"आपण एक अद्वितीय संस्कृती आहोत...शेकडो वर्षांपूर्वी , आधुनिक शस्त्रक्रिया आपल्याला माहित होती, 300 शस्त्रक्रिया , प्लास्टिक सर्जरी, फ्रॅक्चर व्यवस्थापन आणि अगदी सिझेरियन प्रसूतीची आपल्याला माहिती होती.  कल्पना करा. आपल्याला त्याचा खूप अभिमान बाळगण्याची गरज आहे. त्या वेळी, आपण ज्याला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणतो. वैद्यकीय शास्त्रात ते ज्या गोष्टी करतात, त्या आपल्याकडे आधीच होत्या. आणि इतकेच नाही. त्यांनी ते शिक्षणतज्ज्ञांसाठी लेखनाद्वारे जतन केले.  सुश्रुताचे लेखन केवळ शारीरिक ज्ञानच नाही तर वैज्ञानिक विचार , अचूकता, प्रशिक्षण, स्वच्छता आणि रुग्णसेवेवर भर देणारी वैज्ञानिक भावना अधोरेखित  करते", असे ते पुढे म्हणाले.

S.Tupe/S.Chitnis/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2130512)