ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी डेपो दर्पण पोर्टल तसेच अन्न मित्र आणि अन्न सहायता या डिजिटल मंचांचे केले उद्घाटन
Posted On:
20 MAY 2025 9:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 मे 2025
केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज सार्वजनिक वितरण प्रणाली (पीडीएस) मध्ये परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने तीन प्रमुख डिजिटल उपक्रम - डेपो दर्पण पोर्टल आणि डिजिटल प्लॅटफॉर्म -अन्न मित्र आणि अन्न सहायता यांचे उद्घाटन केले.
यामुळे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत 81 कोटींहून अधिक लोकांना अनुदानित अन्नधान्य पोहोचवण्यात सहभागी लाभार्थी आणि आघाडीच्या कामगारांना सक्षम करणे, पारदर्शकता वाढवणे, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे.
आपल्या भाषणात जोशी यांनी समाजातील सर्वात असुरक्षित घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेची पुष्टी केली आणि सांगितले की, "सरकारच्या कल्याणकारी योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे. समाजातील सर्वात कमकुवत घटकांना आमच्या कार्यक्रमांचा लाभ मिळाला पाहिजे."
जोशी यांनी डेपो दर्पणमधील मूल्यांकनाच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकला. प्रक्रिया कार्यक्षमतेद्वारे एफसीआयच्या मालकीच्या डेपोमध्ये अंदाजे ₹ 275 कोटी बचत आणि सीडब्ल्यूसी-संचालित अन्नधान्य गोदामांमध्ये जागेच्या अनुकूल वापराद्वारे सुमारे ₹140 कोटी उत्पन्न वाढण्याची क्षमता आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रक्रियेतील सुधारणांबरोबरच एफसीआय आणि सीडब्ल्यूसी गोदामांतील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांमध्ये त्रुटी असल्याचे मूल्यांकनात आढळून आले, ज्यामुळे कार्यवाही कार्यक्षमता आणि सेवा गुणवत्तेत अडथळा उत्पन्न होतो. ही कमतरता दूर करण्यासाठी आणि सर्व गोदामे "उत्कृष्ट" श्रेणीत श्रेणीबद्ध केली जातील याची सुनिश्चिती करण्यासाठी महत्त्वपूर्ण भांडवली खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे, सीडब्ल्यूसीसाठी ₹280 कोटी आणि एफसीआयसाठी ₹1000 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे, असे ते म्हणाले.
डेपो दर्पण हे एक डिजिटल स्व-मूल्यांकन आणि देखरेख पोर्टल आहे ज्याचा उद्देश डेपो अधिकाऱ्यांना आपल्या कामकाजाचे पद्धतशीरपणे मूल्यांकन करण्यासाठी आणि वाढविण्यासाठी सक्षम करणे हा आहे. अन्नधान्याच्या डेपोंना गोदामातील उत्कृष्टतेचे सर्वोच्च मानक साध्य करण्यास मदत करण्याकरिता तयार करण्यात आलेला हा मंच सुरक्षा मानके, पर्यावरणीय शाश्वतता आणि वैधानिक अनुपालन यासारख्या पायाभूत सुविधा मापदंड आणि भोगवटा पातळी, नफा तसेच साठवण कार्यक्षमता यासारख्या कार्यवाही मापदंडांवर आधारित संयुक्त मानांकन प्रदान करतो. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून डेपो दर्पण पर्यावरणीय आणि सामग्री साठा स्थितीचे खरेखुरे निरीक्षण करण्यासाठी आयओटी सेन्सर्स, सुधारित सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही देखरेख आणि माहितीपूर्ण, डेटा-चालित निर्णय घेण्यास आणि सतत सुधारणांना समर्थन देण्यासाठी विश्लेषणासह लाइव्ह व्हिडिओ फीड्स यांचे एकत्रीकरण करतो.
याशिवाय केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्र्यांनी राज्यमंत्री निमुबेन जयंतीभाई बांभनिया आणि बी.एल. वर्मा यांच्यासोबत सार्वजनिक वितरण प्रणाली (पीडीएस) च्या प्रमुख क्षेत्र-स्तरीय भागधारकांना आवश्यक परिचालन डेटा सुरक्षित, रिअल-टाइम प्रवेशासह मिळवण्यास सक्षम करण्यासाठी 'अन्न सहायता' या मोबाइल ॲपचा देखील आरंभ केला. या ॲपचा उद्देश पीएमजीकेवाय लाभार्थ्यांमध्ये सुलभता, प्रतिसाद आणि पारदर्शकता वाढवणे हा आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील प्रमुख भागधारकांच्या विशिष्ट परिचालन गरजा पूर्ण करण्यासाठी 'अन्न मित्र' ची रचना करण्यात आली आहे.



S.Kakade/N.Mathure/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2130105)