कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डॉ.जितेंद्र सिंह यांनी आयएएस अधिकाऱ्यांची ई-सिव्हिल यादी केली जारी, पारदर्शकता आणि डिजिटल सुधारणांवर दिला भर

Posted On: 19 MAY 2025 7:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 मे 2025


केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री, डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज इलेक्ट्रॉनिक सिव्हिल सूची  2025 ई-पुस्तकाच्या स्वरूपात जारी केली. यामध्ये  देशभरातील कार्यरत  भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकाऱ्यांची माहिती डिजिटली संकलित करण्यात आली आहे.

या सूचीची  70 वी आवृत्ती आणि पूर्णपणे डिजिटल स्वरूपात सादर होणारी पाचवी आवृत्ती  हा  एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

डॉ.जितेंद्र सिंह यांनी ई-पुस्तकाचे अनावरण करताना सांगितले की, भारतीय प्रशासकीय सेवा देशातील  उत्कृष्ट विचारवंतांना आकर्षित करते आणि भारताच्या संघराज्य प्रशासनाला बळकटी देण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. या सूचीमुळे देशाच्या प्रशासकीय नेतृत्वाचा संरचित दृष्टिकोन सादर केला जात असून हे पारदर्शकतेचे एक महत्त्वाचे साधन असल्याचे सिंह यांनी अधोरेखित केले.

डॉ.जितेंद्र सिंह यांनी ई-सिव्हिल सूचीमध्ये ‘एआय आधारित शोध’ पर्यायासारखे एआय आधारित पर्याय प्रस्तावित केले. या सूचीची प्रासंगिकता आणि उपयुक्तता टिकवून ठेवण्यासाठी ती नियमितपणे अद्ययावत  करण्याचे महत्त्वही त्यांनी विशद केले.

कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) प्रकाशित केलेल्या या ई-पुस्तकात आयएएस अधिकाऱ्यांची सर्वसमावेशक माहिती आहे - त्यांचे नाव, बॅच, केडर, सध्याची पोस्टिंग, वेतन स्तर, शैक्षणिक पात्रता आणि निवृत्तीच्या तारखा इत्यादींचा त्यात समावेश असून ती 1  जानेवारी 2025  रोजी अद्ययावत  करण्यात आली आहे.त्यात केडरनिहाय संख्या, पुढील पाच वर्षांत निवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या आणि 1969 पासूनच्या नियुक्तीचा डेटा देखील समाविष्ट आहे. पहिल्यांदाच, अधिकाऱ्यांचे फोटो डिजिटल दस्तऐवजात समाविष्ट करण्यात आले आहेत.

एम्बेडेड हायपरलिंक्ससह शोध करण्यायोग्य पीडीएफ स्वरूपात  तयार  केलेले, हे ई-बुक वापरकर्ता-अनुकूल इंटरफेस देते जे माहितीवर त्वरित अॅक्सेस करण्यास सक्षम आहे. " सिव्हिल सूची  ही केवळ प्रशासक आणि निर्णय घेणाऱ्यांसाठीच नाही तर सामान्य लोकांसाठी देखील एक महत्त्वाचा माहिती स्त्रोत आहे," डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, हे पाऊल डिजिटल प्रशासनासाठी केंद्राच्या मोठ्या प्रयत्नांना प्रतिबिंबित करते.

आयएएस अधिकाऱ्यांचे केडर-नियंत्रण करणारे प्राधिकरण म्हणून, डीओपीटी दरवर्षी केंद्रीय नोंदी आणि राज्य केडरमधील माहिती वापरून सिव्हिल सूची  तयार करते. 2025  च्या आवृत्तीत एकूण 6,877 अधिकाऱ्यांची अधिकृत केडर क्षमता आहे, ज्यामध्ये 25 राज्य केडरमध्ये 5,577  अधिकारी सक्रिय सेवेत आहेत.

ई-बुक सिव्हिल लिस्ट, 2025 आता डीओपीटी संकेतस्थळ https://dopt.gov.in वर जनतेसाठी उपलब्ध आहे.

N.Chitale/H.Kulkarni/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 


(Release ID: 2129713)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil