कृषी मंत्रालय
कृषी संशोधन संस्थेच्यापरस्पर समन्वयातून 'एक राष्ट्र एक शेती आणि एक संघ 'हे तत्व साकार होणार - केंद्रीय कृषी मंत्री आणिशेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे प्रतिपादन
आयसीएआरच्या देशभरात 113 संस्था असून त्यातील 11संस्था या महाराष्ट्रात- केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान
'नॅशनल सॉईल स्पेक्ट्रम स्पेक्ट्रल लायब्ररीचे कृषी मंत्री चौहान यांनी केलं उद्घाटन ;महाराष्ट्र मृदा नकाशा-सॉईल मॅप असलेले बनले पहिले राज्य
रोपट्यांच्या मूळ प्रतीच्या संशोधनाकरिता पुण्यात प्रयोगशाळा स्थापन करण्यात येईल - चौहान
नैसर्गिकशेती ,सेंद्रिय शेती तसेच शेतकरी उत्पादक संघ यामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागपूर विभागातील शेतकऱ्यांचा केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
Posted On:
18 MAY 2025 5:52PM by PIB Mumbai
नागपूर 18 मे 2025
कृषीसंशोधनासाठी कार्यरत असणाऱ्या भारतीय कृषी संशोधन परिषद- आयसीएआर 'च्या संशोधनसंस्था यांच्या परस्पर समन्वयातून 'एक राष्ट्र एक शेती आणि एक संघ 'हे तत्व साकार होणार असूनकृषी समृद्धीच्या संदर्भात केंद्र सरकार राज्य शासनासोबत कार्यरत राहील असेप्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंहचौहान यांनी आज नागपूर मध्ये केले.

नागपूर येथील कविवर्य सुरेशभट सभागृहात आयोजित विकसित कृषी संकल्प अभियाना अंतर्गत कृषी संवाद याकार्यक्रमांमध्ये केंद्रीय कृषिमंत्री चौहान विदर्भातील शेतकऱ्यांशीसंवाद साधत होते. होल्ड बाईट (शिवराज सिंग चौहान सेकंद) याप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे कृषीमंत्री अॅड. माणिक कोकाटे. भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ.एम.एल.जाट .प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी चोहान यांनीमाहिती देताना सांगितलं की आयसीएआरच्या देशभरात 113 संस्था असून त्यातील 11संस्था या महाराष्ट्रातअसून नागपुरातील मृदा सर्वेक्षण संस्था - एनबीएसएसएलयूपी येथे या सर्वसंस्थेच्या प्रमुखांसोबत आपण बैठक घेणार असून महाराष्ट्रातील कृषी विकासाची दिशाया बैठकीतून साध्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रयोगशाळा आणि जमीनयांच्यातील दरी कमी करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. देशभरामध्ये आयसीएआरसंस्थेचे 16,000 कृषी वैज्ञानिक असून आयसीएआरचे शास्त्रज्ञकृषी विस्तार अधिकाऱ्यांसह एक टीम म्हणून गावांना भेट देतील आणि शेतकऱ्यांना नवीनप्रकारच्या बियाण्यांबद्दल आणि शेतीतील नवीन नवोपक्रमांबद्दल शिक्षित करतील.

येत्या 29 मे ते 12जून या पंधरादिवसाच्या अभियानामध्ये खरीप हंगामाच्या नियोजनाकरिता कृषी वैज्ञानिक गावांना भेटीदेतील आणि शेतकऱ्यांना शाश्वत शेती बद्दल मार्गदर्शन करतील असे त्यांनी सांगितले चौहान यांनी शेती उत्पादन वाढवण्यावर भर देताना सांगितले की,शुद्ध आणिरोगमुक्त रोपवाटिका सुनिश्चित करण्यासाठी स्वच्छ वनस्पती कार्यक्रम- क्लिन प्लांटप्रोग्रॅम राबविला जात आहे. रोपट्यांच्या मूळ प्रतीच्या संशोधनाकरिता पुण्यातप्रयोगशाळा स्थापन करण्यात येईल. उत्पादन वाढीकरिता. चांगल्या दर्जाचे बियाणे,माती परीक्षणआणि उत्पादन खर्चात कपात करणे हे शेतकऱ्यांनी समजून घेतले पाहिजे.

एनबीएसएसएलयूपीनेहायपर स्प्रेक्टल सेंसर तत्रज्ञानाचा वापर करून देशातील विविध विभागांची मातीचीसामू ( पीएच ) ,घनता तसेच मूलद्रव्यांची स्पेक्टोरेडिओ मिटर द्वारे संकलितकेलेल्या माहितीचा समावेश असलेल्या 'नॅशनल सॉईल स्पेक्ट्रमस्पेक्ट्रल लायब्ररीचे उद्घाटन कृषी मंत्री चौहान यांनी मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांच्यासमवेत केले. या तंत्रज्ञानाच्या उद्घाटनासोबतच, महाराष्ट्र मृदा नकाशा-सॉईल मॅप असलेले पहिले राज्य बनले आहे.

कापसाच्या पिकांवर पडणा-या गुलाबी बोंडअळीच्या कीड व्यवस्थापनाकरीता AI-आधारित स्मार्टट्रॅप तंत्रज्ञानाचे देखील प्रारंभ याप्रसंगीचौहान यांनी केला. हे तंत्र शेतकऱ्यांना संक्रमित पिकांबद्दल अलर्ट पाठवेल.
याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील वैनगंगा नळगंगा नदी प्रकल्प बाबत माहितीदिली या प्रकल्पामुळे विदर्भातील सिंचन क्षमता वाढणार आहे .शिवराज सिंग चौहानयांनी संपूर्ण राष्ट्रासाठी समावेशक असे धोरण आखले असून राज्य सरकारचे त्यालापूर्ण सहकार्य राहील असे देखील फडणवीस यांनी स्पष्ट केले.

कृषी मंत्री अॅड. माणिकरावकोकाटे यांनी सांगितले की कापूस वेचणीमध्ये सध्या मजूर मिळणे कठीण झाले आहे यासाठी बॅटरीच्या साह्याने चालणाऱ्या छोट्याट्रॅक्टर वर संशोधन आणि विकास चालू आहे जर हे संशोधन सफल झाळे तर ते कृषीमंत्रालयाला सादर केले जाईल असे देखीलत्यांनी सांगितले . याप्रसंगी नैसर्गिकशेती ,सेंद्रिय शेती तसेच शेतकरीउत्पादक संघ यामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागपूर विभागातील शेतकऱ्यांचासत्कार कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला .या कार्यक्रमाला नागपूर विभागातून आलेले शेतकरी, कृषी अधिकारीमोठ्या संख्येने उपस्थित होते.

***
D.Wankhede/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2129458)