वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंध

प्रविष्टि तिथि: 17 MAY 2025 9:13PM by PIB Mumbai

 

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारितील परकीय व्यापार महासंचालनालयाने  बांगलादेशमधून भारतात तयार कपडे, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ अशा विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर निर्बंध लावणारी अधिसूचना जारी केली आहे. मात्र, भारतामार्गे भूतान आणि नेपाळकडे जाणार्‍या बांगलादेशच्या वस्तूमालासाठी हे निर्बंध लागू नसतील.

या संदर्भातली अधिसूचना 17 मे 2025 रोजी जारी केली गेली. याअंतर्गत अधिसूचना क्रमांक 07/2025-26 द्वारे जारी केलेल्या बंदर विषयक निर्बंधांचे तपशील खाली दिले असून, ते त्वरित लागू झाले असल्याचे संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

  1. देशाच्या कोणत्याही भूमी बंदरातून बांगलादेशमधून सर्व प्रकारच्या तयार कपड्यांची आयात करण्याला परवानगी दिली जाणार नाही, मात्र, केवळ न्हावा शेवा आणि कोलकाता या सागरी बंदरांमधूनच अशा आयातीला परवानगी दिली जाईल.
  2. फळे/फळांच्या चवीची आणि कार्बोनेटेड पेये; प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ; कापूस आणि सूत धाग्याचे अवशेष; स्वतःच्या उद्योगासाठी लागणारे इनपुट बनवणारी पिगमेंट्स, रंगद्रव्ये, प्लास्टिसायझर्स आणि ग्रॅन्युल्स वगळून प्लास्टिक  आणि तयार पीव्हीसी वस्तू, लाकडी फर्निचर, या वस्तूंच्या आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराममधील कोणत्याही भूमी  सीमा शुल्क ठाणी / एकात्मिक तपास चौक्या; आणि पश्चिम बंगालमधील  चांग्राबांधा आणि फुलबारी भूमी  सीमा शुल्क ठाणी या मार्गाने आयात करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
  3. बांगलादेशमधून मासे, एलपीजी, खाद्यतेल आणि खडी  आयातीसाठी हे बंदर विषयक निर्बंध लागू नसतील.

या संदर्भातील तपशीलवार अधिसूचना परकीय व्यापार महासंचालनालयाच्या https://dgft.gov.in. या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

***

N.Chitale/T.Pawar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2129385) आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Khasi , English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Gujarati