वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डीपीआयआयटी आणि जीईएएपी यांच्यात भागीदारी : भारतात हवामान-तंत्रज्ञान उद्योजकतेला चालना

Posted On: 17 MAY 2025 9:58AM by PIB Mumbai

 

उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने (डीपीआयआयटी)  ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अँड प्लॅनेट (जीईएएपी) सोबत एक सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. या कराराचा उद्देश भारतातील स्वच्छ ऊर्जा आणि उत्पादन क्षेत्रात नवकल्पना, शाश्वतता आणि उद्योजकतेला गती देणे हा आहे.

हा दोन वर्षांचा करार असून, त्यामध्ये विस्ताराची तरतूद आहे. या भागीदारीद्वारे सुरुवातीच्या टप्प्यातील हवामानावर आधारित तंत्रज्ञानयुक्त स्टार्टअप्सना निधी, मार्गदर्शन, पायलट प्रकल्पांची संधी आणि बाजारपेठेतील संपर्क यांसारखे आधार मिळणार आहेत. हे उपक्रम भारताच्या नेट-झिरो उद्दिष्टांसाठी सुसंगत आणि गुंतवणुकीसाठी तयार अशा स्टार्टअप्सची भक्कम साखळी निर्माण करेल.

या करारांतर्गत, जीईएएपी "एनर्जी ट्रांझिशन्स इनोव्हेशन चॅलेंज (एएनटीआयसीई)" नावाचे स्पर्धात्मक व्यासपीठ सुरू करेल, ज्यामध्ये प्रभावी उपायांसाठी 500,000 रुपयापर्यंतचे बक्षीस दिले जाईल. स्पेक्ट्रम इम्पॅक्ट आणि अवाना कॅपिटल यांसारख्या भागीदार संस्थांच्या माध्यमातून गुंतवणूक पाठबळही दिले जाईल. डीपीआयआयटी हा कार्यक्रम स्टार्टअप इंडिया नेटवर्कशी जोडेल आणि प्रमुख सरकारी योजनांद्वारे प्रचार-प्रसार करेल.

डीपीआयआयटी चे संयुक्‍त सचिव संजीव यांनी सांगितले की, भारताचे हवामान नेतृत्व हे मजबूत उद्योजक पायाभूत सुविधांवर अवलंबून आहे. त्यांनी नमूद केले की, ही भागीदारी स्वच्छ ऊर्जा स्टार्टअप्सना त्यांच्या तंत्रज्ञानाचा विस्तार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध करून देईल.

जीईएएपी भारताचे उपाध्यक्ष  सौरभ कुमार यांनी या  सामंजस्य कराराला एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून संबोधले, जे उद्योग, सरकार आणि नवोन्मेषक यांच्यातील सहकार्याच्या माध्यमातून प्रणालीगत बदल घडवून आणू शकेल. त्यांनी सांगितले की, जीईएएपी चे जागतिक अनुभव, स्टार्टअप इंडिया नेटवर्क आणि डीपीआयआयटी चे संस्थात्मक पाठबळ यांच्या एकत्रीकरणामुळे स्वच्छ ऊर्जा उद्योजकतेसाठी नवे मार्ग खुले होतील.

हा सामंजस्य करार डॉ. सुमीत जरंगल आणि सौरभ कुमार यांच्या उपस्थितीत, दोन्ही संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर करण्यात आला.

***

JPS/G.Deoda/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2129282)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil