सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सांस्कृतिक मंत्रालयाने 'एक देश एक धडकन' उपक्रमाच्या माध्यमातून देशभक्तीचा उत्साह जागवला

Posted On: 16 MAY 2025 8:50PM by PIB Mumbai

 

देशभक्तीची भावना जागवण्यासाठी आणि देशाच्या शूरवीरांना आदरांजली वाहण्यासाठी, सांस्कृतिक मंत्रालयाने ‘एक देश एक धडकन’ हा उत्साहवर्धक उपक्रम सुरू केला आहे.

देशाभिमानाच्या सामायिक भावनेने संपूर्ण देशाला एकत्र आणण्याच्या दृष्टीने आखण्यात आलेल्या या अभियानाचे पडसाद भारतभरातील नागरिकांच्या मनात उमटू लागले आहेत. #EkDeshEkDhadkan (#OneNationOneHeartbeat) हे घोषवाक्य डिजिटल प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात स्वीकारले जात आहे, जे एकतेची भावना, देशभक्तीचा उत्साह आणि तिरंगा झेंड्याप्रति आदर द्विगुणीत करत आहे. हे कृतज्ञ राष्ट्राच्या सामूहिक भावनेचे प्रतीक आहे, आम्ही आमच्या अनाम वीरांच्या आणि शूर सैनिकांच्या शौर्याला आणि बलिदानाला सलाम करतो.

संपूर्ण देशाचा सहभाग

गेल्या 48 तासांत सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारीतील सर्व 43 संस्थांनी एकत्रित आणि उत्साही सहभाग नोंदवला आहे.

आपल्याला एकत्र बांधून ठेवणाऱ्या तिरंगा झेंड्याला वंदन करून, सशस्त्र दल आणि शूरवीरांना सलाम करून सर्व संस्थांनी आपले डिस्प्ले पिक्चर (डीपी) बदलून त्या जागी तिरंगा झेंडा प्रदर्शित केला आहे. 

तिरंगा ध्वजाच्या रंगात उजळून निघाली एएसआय स्मारके

प्रमुख सांस्कृतिक संस्था आणि वारसा स्थळे भारतीय ध्वजाच्या रंगात उजळून निघाली आहेत.

सर्व भारतीयांना हा गौरवाचा क्षण एकत्रितपणे साजरा करता यावा, यासाठी सांस्कृतिक मंत्रालया अंतर्गत सर्व संस्था आणि संघटना विशेष कथाकथन कार्यक्रम, चित्रांच्या माध्यमातून आणि सांगीतिक आदरांजली, विशेष प्रदर्शने, प्रश्नमंजुषा, बॅज/रिस्टबँड वाटप, तिरंगा रॅली यासारखे कार्यक्रम लोकसहभागाने आयोजित करत आहेत.

***

S.Kane/R.Agashe/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2129241)
Read this release in: English