सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'नॅशनल अकाउंट्स स्टॅटिस्टिक्स - 2025 चे प्रकाशन

Posted On: 16 MAY 2025 5:49PM by PIB Mumbai

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने 'नॅशनल अकाउंट्स स्टॅटिस्टिक्स - 2025', अर्थात राष्ट्रीय लेखा सांख्यिकी– 2025 प्रकाशित केले आहे, जे भारतीय अर्थव्यवस्थेच्या राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन आणि खर्चाच्या एकत्रित आकडेवारीचा सर्वसमावेशक स्त्रोत आहे. हे प्रकाशन संरचित डेटा स्टेटमेंट द्वारे राष्ट्रीय खात्यांची अधिक तपशीलवार माहिती देते, आणि भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी आणि त्यामधील संरचनात्मक बदल समजून घेण्यासाठी आणि त्याचे मूल्यांकन करण्यासाठी धोरणकर्ते, संशोधक, विश्लेषक आणि संबंधितांना  महत्वाची सांख्यिकी माहिती देणारा स्रोत म्हणून काम करते.

हे प्रकाशन आर्थिक वर्ष 2023-24 साठी जीडीपीचा पहिला सुधारित अंदाज आणि फेब्रुवारी 2025 मध्ये जारी करण्यात आलेल्या आर्थिक वर्ष 2022-23 साठीचा अंतिम अंदाज लक्षात घेते, जो प्रमुख मॅक्रोइकॉनॉमिक निर्देशांक पुरवतो. हे प्रकाशन सकल देशांतर्गत उत्पादन (GDP), सकल मूल्यवर्धित (GVA), उपभोग, बचत, भांडवल निर्मिती आणि संबंधित मॅक्रोइकॉनॉमिक आर्थिक निर्देशकांचे तपशीलवार अंदाज प्रदान करते. हे अंदाज सध्याच्या आणि स्थिर (2011-12)  किमतींवर सादर केले जातात  आणि ते संयुक्त राष्ट्रांच्या राष्ट्रीय लेखा प्रणालीशी सुसंगत पद्धतींवर आधारित असतात.

ठळक मुद्दे:

·       2022-23 (अंतिम अंदाज) आणि 2023-24 (पहिला सुधारित अंदाज) या वर्षांसाठी जीडीपी आणि जीव्हीए अंदाज, ज्यामध्ये 2011-12 पासून टाइम सीरिज डेटासह प्रशासकीय आणि सर्वेक्षण स्रोतांकडून मिळालेला अद्ययावत डेटा इनपुट समाविष्ट आहे.

· शेती, उद्योग आणि सेवा यासह अन्य क्षेत्रांच्या कामगिरीचे तपशीलवार क्षेत्रीय विश्लेषण.

· कुटुंबे, कॉर्पोरेट क्षेत्र आणि सरकार मधील उपभोग, बचत आणि भांडवल निर्मितीबाबतचे  वेगवेगळे अंदाज.

'राष्ट्रीय लेखा सांख्यिकी - 2025' विवरणपत्रे (परिशिष्ट) एमओएसपीआयच्या (MoSPI) अधिकृत वेबसाइटवर डाउनलोड करण्यासाठी येथे उपलब्ध आहेत:

https://www.mospi.gov.in/publication/national-accounts-statistics-2025.

याशिवाय, 'राष्ट्रीय लेखा सांख्यिकी - 2024' हे प्रकाशन विविध संस्थात्मक क्षेत्रांच्या हिशेबाच्या अनुक्रमावरील विवरणचा समावेश करून अद्ययावत करण्यात आले आहे. ही विवरणे येथे उपलब्ध आहेत:

https://www.mospi.gov.in/publication/national-accounts-statistics-2024.

***

S.Kane/R.Agashe/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2129165)