कृषी मंत्रालय
हसार (हरियाणा) येथील नॉर्दर्न रिजन फार्म मशिनरी ट्रेनिंग अँड टेस्टिंग इन्स्टिट्यूटला (NRFMTTI) कृषी ट्रॅक्टरसाठी सीएमव्हीआर चाचणी करण्यासाठी मिळाली मान्यता
Posted On:
14 MAY 2025 9:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 मे 2025
हसार (हरियाणा) येथील नॉर्दर्न रिजन फार्म मशिनरी ट्रेनिंग अँड टेस्टिंग इन्स्टिट्यूट (NRFMTTI) ने ‘कृषी ट्रॅक्टरसाठी सीएमव्हीआर (CMVR) चाचणी मान्यता’ आणि ‘कृषी ट्रॅक्टर आणि कंबाइन हार्वेस्टर्सच्या सीएमव्हीआर (CMVR) चाचणीसाठी एनएबीएल (NABL) मान्यता’ प्राप्त केली आहे.
कृषी यंत्रसामग्रीच्या प्रशिक्षण आणि चाचणीमध्ये आघाडीचे नाव असलेली एनआरएफएमटीटीआय, टीटीसी, हिसार, आता कम्बाइन हार्वेस्टर्स व्यतिरिक्त कृषी ट्रॅक्टरसाठी सीएमव्हीआर (केंद्रीय मोटार वाहन नियम) चाचणी करणारी मान्यताप्राप्त संस्था बनली आहे.
त्याचप्रमाणे संस्थेला कृषी ट्रॅक्टर आणि कंबाइन हार्वेस्टर या दोन्हींच्या सीएमव्हीआर चाचणीसाठी एनएबीएल (नॅशनल ॲक्रिडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज) मान्यता प्राप्त झाली आहे.
यामुळे उत्तर भारतातील ट्रॅक्टर उत्पादकांना या संस्थेत त्यांच्या ट्रॅक्टरची जवळच्या परिसरात सीएमव्हीआर अनुपालन चाचणी करून घेता येईल. शिवाय, एनएबीएल मान्यते अंतर्गत कृषी ट्रॅक्टर आणि कंबाइन हार्वेस्टर्सचे सीएमव्हीआर प्रमाणन, जगभरात चाचणीची विश्वासार्हता आणि स्वीकारार्हता वाढवेल.
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2128768)