सांस्कृतिक मंत्रालय
सांस्कृतिक मंत्रालय आणि आयबीसी डॉ. बीआर आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात प्रार्थना, संवाद आणि सांस्कृतिक वैभवासह वैशाख बुद्ध पौर्णिमा दिवस साजरा करणार
Posted On:
14 MAY 2025 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 मे 2025
सांस्कृतिक मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ (आयबीसी) वैशाख बुद्ध पौर्णिमा दिवस - भगवान शाक्यमुनी बुद्धांच्या जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण चिन्हित करणारा हा त्रिगुण धन्य दिनाचा पवित्र प्रसंग साजरा करण्यासाठी सज्ज आहे. हा कार्यक्रम 15 मे 2025 (गुरुवार) रोजी नवी दिल्लीतील जनपथ येथील डॉ. बी आर आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र (सभागृह) येथे आयोजित केला जाईल. संसदीय कार्य आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू या कार्यक्रमाचे सन्माननीय पाहुणे असतील आणि सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत प्रमुख पाहुणे असतील.
या कार्यक्रमात प्रार्थना आणि 'संघर्ष निवारणात बुद्ध धम्माचा वापर' या विषयावर विचारप्रवर्तक पॅनेल चर्चा होणार आहे. गेशे दोरजी दामदुल (संचालक, तिबेट हाऊस, नवी दिल्ली), प्रा. हिरा पॉल गंग नेगी (माजी विभाग प्रमुख, बौद्ध अभ्यास, दिल्ली विद्यापीठ) आणि प्रा. बिमलेंद्र कुमार (प्राध्यापक, पाली आणि बौद्ध अभ्यास, बीएचयू) यांच्यासह प्रतिष्ठित बौद्ध विद्वान-भिक्षू आणि विषय तज्ञ बुद्धांच्या शिकवणींच्या कालातीत प्रासंगिकतेवर आपले विचार सामायिक करतील.
प्रतिष्ठित बौद्ध भिक्षुणी, आदरणीय ग्याल्टसेन समतेन यांचे विशेष भाषण होईल आणि प्रसिद्ध गायिका सुभद्रा देसाई रत्न सुत्त सादर करतील.
या दिवसाचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करणारी दोन प्रमुख प्रदर्शने देखील आयोजित केली जातील:
1. भारताचा तुलनात्मक बौद्ध कला इतिहास
2. बुद्धांचे जीवन आणि शिकवण
ही प्रदर्शने व्हिएतनाममधील हो ची मिन्ह सिटी येथे आयोजित संयुक्त राष्ट्रांच्या वेसाक दिन 2025 च्या समारंभाचा भाग होती, जी चार व्हिएतनामी शहरांमध्ये सारनाथमधील बुद्धांच्या पवित्र अवशेषांच्या प्रदर्शनासोबत आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमात आशियामध्ये बुद्ध धम्माच्या प्रसारावर माहितीपट आणि बुद्धांच्या पवित्र अवशेषांच्या प्रदर्शनावरील एक चित्रपट देखील दाखवला जाईल. यावर्षी वैशाख पौर्णिमा 12 मे रोजी येत असली तरी, या प्रसंगाच्या पावित्र्यामुळे संपूर्ण महिनाभर उत्सव साजरा केला जातो. 15 मे रोजी होणारा हा मेळावा वेसाक /वैशाख दिनाच्या या जागतिक आणि महिनाभर चालणाऱ्या उत्सवाचा भाग आहे. या स्मरणोत्सवाचा समारोप प्रख्यात कलाकार गुरु अल्पना नायक आणि त्यांच्या पथकाच्या सांस्कृतिक सादरीकरणाने होईल, ज्यात बुद्धांचे जीवन आणि शिकवणींनी प्रेरित आध्यात्मिक आणि कलात्मक वारशाचा उत्सव साजरा केला जाईल.
S.Patil/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2128766)