अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मॉर्निंगस्टार डीबीआरएस या जागतिक पतमानांकन संस्थेने भारताच्या मानांकन श्रेणीत सुधारणा करून बीबीबी (निम्न) वरून स्थिर ट्रेंडसह बीबीबीमध्ये मध्ये अपग्रेड केली

Posted On: 09 MAY 2025 7:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 मे 2025

 

मॉर्निंगस्टार डीबीआरएस या स्वतंत्र जागतिक पतमानांकन संस्थेने भारताचे दीर्घकालीन परकीय आणि स्थानिक चलन जारीकर्ता मानांकनाच्या श्रेणीमध्ये सुधारणा करून ते बीबीबी (निम्न) वरून स्थिर ट्रेंडसह बीबीबीमध्ये अपग्रेड केले आहे.

भारताचे अल्पकालीन परकीय आणि स्थानिक चलन जारीकर्ता मानांकन देखील स्थिर ट्रेंडसह आर -2 (मध्यम) वरून आर -2 (उच्च) मध्ये अपग्रेड केले आहे.

या श्रेणी सुधारणेसाठी (अपग्रेडेशन) कारणीभूत ठरलेल्या प्रमुख घटकांमध्ये पायाभूत सुविधांमधील  गुंतवणूक, डिजिटलायझेशन इत्यादींद्वारे भारताच्या संरचनात्मक सुधारणांचा समावेश असून, या सर्वांमुळे वित्तीय एकत्रीकरण (घटते कर्ज आणि तूट), स्थिर विकास वृद्धी (आर्थिक वर्ष 2022-25 दरम्यान सरासरी जीडीपी वृद्धी 8.2%) आणि मॅक्रोइकॉनॉमिक, अर्थात व्यापक आर्थिक स्थैर्य (स्थिर महागाई, सीमाबद्ध विनिमय दर आणि मजबूत बाह्य संतुलन) मिळवण्यासाठी सहाय्य झाले.

भारताने गुंतवणुकीचा दर वाढवून मध्यम मुदतीच्या विकासाच्या संधी वाढवणाऱ्या सुधारणांची अंमलबजावणी सुरु ठेवली, तर पतमानांकनात आणखी सुधारणा शक्य आहे.

अहवालात असेही म्हटले आहे की सध्या सार्वजनिक कर्जाच्या सध्याची पातळी असूनही, स्थानिक चलनाचे मूल्य आणि कर्ज परिपक्वतेसाठी दीर्घ मुदतीच्या संरचनेमुळे कर्जाच्या शाश्वततेसाठी मर्यादित जोखीम राहील. त्याशिवाय, सातत्यपूर्ण सुधारणा आणि सार्वजनिक कर्ज-जीडीपी गुणोत्तरातील कपात यामुळे पतमानांकनात आणखी सुधारणा शक्य आहे.

मॉर्निंगस्टार डीबीआरएसचे रेटिंग स्केल (पतमानांकन निकष) फिच एन्ड एस अँड पी च्या रेटिंग स्केल प्रमाणेच आहे. (मॉर्निंगस्टार डीबीआरएस ‘उच्च ’ आणि ‘निम्न’ असे प्रत्यय वापरून उपवर्गीकरण करतात, तर फिच एन्ड एस अँड पी चे +/- असे उप वर्गीकरण असते).

अहवालासाठी इथे क्लिक करा किंवा खालील लिंक वर क्लिक करा:

https://dbrs.morningstar.com/research/453673/morningstar-dbrs-upgrades-india-to-bbb-trend-changed-to-stable

 

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2127971)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu