सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विमुक्त, भटक्या आणि अर्ध-भटक्या समुदायांसाठी विकास आणि कल्याणकारी मंडळ (DWBDNC)


केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी छत्रपती संभाजीनगरमधील तिसगावटांडा गावाला भेट देऊन विमुक्त, भटक्या आणि अर्ध-भटक्या समुदायांसाठीच्या कल्याणकारी उपक्रमांचा घेतला आढावा घेतला

Posted On: 08 MAY 2025 7:38PM by PIB Mumbai

मुंबई, 7 मे 2025

 

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी आज (8 मे, 2025) महाराष्ट्रात, जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यामधील तिसगावटांडा या गावाला भेट दिली. या भेटीत त्यांनी विमुक्त, भटक्या आणि अर्ध-भटक्या समुदायांसाठी (De-notified, Nomadic, and Semi-Nomadic Communities - DNTs) सुरू असलेल्या विकास आणि कल्याणकारी उपक्रमांचा आढावा घेतला. विमुक्त, भटक्या आणि अर्ध-भटक्या समुदायांसाठीच्या सीड अर्थात आर्थिक सक्षमीकरण योजनेअंतर्गतच्या (Scheme for Economic Empowerment of DNTs - SEED) कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसह राज्य सरकारद्वारे राबवल्या जात असलेल्या विविध उपक्रमांच्या मूल्यमापनाच्या अनुषंगानेच डॉ. वीरेंद्र कुमार याची ही भेट आखली गेली होती.

यावेळी केंद्रीय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी उपस्थितांना संबोधितही केले. देशातील सर्वात दुर्लक्षित आणि सामाजिक-आर्थिकदृष्ट्या वंचित असलेल्या विमुक्त, भटक्या आणि अर्ध-भटक्या समुदायांच्या उत्थानासाठी भारत सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने या समुदायांसाठी कल्याणकारी आणि विकास योजनांची लक्ष्य निर्धारीत पद्धीने अंमलबजावणी व्हावी याची सुनिश्चिती करण्याकरता विमुक्त, भटक्या आणि अर्ध-भटके समुदाय विकास आणि कल्याणकारी मंडळाची (DWBDNC) स्थापना केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

या भेटीदरम्यान डॉ. वीरेंद्र कुमार यांनी राज्य सरकारचे अधिकारी, सीड (SEED) योजनेच्या अंमलबजावणीत सहभागी असलेल्या भागिदार स्वयंसेवी संस्था, विमुक्त, भटक्या आणि अर्ध-भटक्या समुदायातील लाभार्थी आणि विद्यार्थी, स्वयं-सहायता गटाच्या सदस्य आणि स्थानिक सामाजिक नेते यांसारख्या विविध भागधारकांशी थेट संवाद साधला. या संवादामुळे केंद्रीय मंत्र्यांना या  कार्यक्रमांची परिणामकारकता आणि प्रभावाविषयीची प्रत्यक्ष स्थितीदर्शक माहिती जाणून घेता आली.

या भेटीदरम्यान, विमुक्त, भटक्या आणि अर्ध-भटक्या समुदायाच्या पात्र लाभार्थ्यांना, खाली नमूद विविध हक्क आणि लाभांचेही वितरण केले गेले:

  • आयुष्मान भारत आरोग्य विमा कार्ड (Ayushman Bharat Health Insurance Cards), दर्जेदार आरोग्य सेवा सुनिश्चित करणे.
  • कामगार कल्याण स्मार्ट कार्ड (KamgarKalyan Smart Cards), असंघटित कामगारांना कल्याणकारी लाभ सुलभतेने उपलब्ध करून देणे.
  • जात प्रमाणपत्र, आरक्षण आणि तत्सम योजनांचा (affirmative action schemes) लाभ घेण्यासाठी आवश्यक दस्तऐवज.
  • स्वयं-सहायता गटांसाठी फिरता निधी (Revolving Funds to Self-Help Groups), उत्पन्न निर्माणासाठीच्या उपक्रमांना पाठबळ देण्यासाठी.
  • प्रारंभिक पातळीवरील उपक्रम (Entry Point Activities) - नव्याने स्थापन झालेल्या स्वयं-सहायता गटांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि एकात्मता वाढवण्याच्या उद्देशासाठी

सीड (SEED) ही योजना 2.50 लाख किंवा त्यापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या आणि केंद्र अथवा राज्य सरकारच्या तत्सम योजनांचा लाभ घेत नसलेल्या कुटुंबांसाठी आखली गेली आहे.  या योजनेअंतर्गत विमुक्त, भटक्या आणि अर्ध-भटक्या समुदायांच्या कल्याणासाठी चार प्रमुख घटक नश्चित केले गेले आहेत:

  • विमुक्त, भटक्या आणि अर्ध-भटक्या समुदायांतील उमेदवारांना स्पर्धा परीक्षांसाठी गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण प्रदान करणे.
  • विमुक्त, भटक्या आणि अर्ध-भटक्या समुदायांना आरोग्य विमा प्रदान करणे.
  • विमुक्त, भटक्या आणि अर्ध-भटक्या/भटक्या/अर्ध भटक्या समुदायांतील लहान गटांसाठी समुदायिक स्तरावरील उपजीविकेच्या उपक्रमांना प्रोत्साहन देणे.
  • विमुक्त, भटक्या आणि अर्ध-भटक्या समुदायांतील व्यक्तींना घरकुल  बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे.

 

* * *

PIB Mumbai | S.Bedekar/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2127796)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil