अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय शेअर बाजारात भारतातील पहिल्या गृहकर्ज समर्थित ‘पास थ्रू’ प्रमाणपत्रे सूचीबद्ध

Posted On: 05 MAY 2025 8:56PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 मे 2025 

 

वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम. नागराजू यांनी 5 मे 2025 रोजी राष्ट्रीय शेअर बाजारात आरएमबीएस डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड संरचित भारतातील पहिल्या गृहकर्ज समर्थित पीटीसी म्हणजेच ‘पास थ्रू’ प्रमाणपत्रे  एम. नागराजू यांनी घंटा वाजवून सूचीबद्ध केली. या सूचीबद्ध करण्याच्या  समारंभात अनेक बँका, गृहनिर्माण वित्त कंपन्या आणि अन्य वित्तीय संस्थांचे प्रमुख उपस्थित होते.

या पीटीसींना एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने सुरू केलेल्या गृहकर्ज संकलनाचे समर्थन आहे. 1,000 कोटी रुपयांचा (1,00,000/- रुपयांच्या दर्शनी मूल्याचे 1,00,000 पीटीसी) इश्यू पूर्णपणे सबस्क्राइब झाला होता.

हा पीटीसीचा पहिला इश्यू आहे जिथे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या “इलेक्ट्रॉनिक बुक प्रोव्हायडर (ईबीपी)” प्लॅटफॉर्मवर कूपन आढळले. जारी केलेल्या पीटीसीची अंतिम परिणता मुदत जवळजवळ वीस वर्षे असेल आणि कूपन  वार्षिक 7.26% आहे. या इन्स्ट्रुमेंटचे रेटिंग क्रिसिल आणि केअर रेटिंग्ज द्वारे AAA(SO) आहे. हे पीटीसी डीमॅट स्वरूपात जारी केले जातात आणि हस्तांतरणीय आहेत. पीटीसी शेअर बाजारात सूचीबद्ध असल्याने, ते दुय्यम बाजारात व्यवहार केले जाऊ शकतात.

यावेळी नागराजू यांनी आपल्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी गृहनिर्माण क्षेत्र आणि गृहनिर्माण वित्त क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की,  गृहनिर्माण वित्त क्षेत्राचे पायाभूत सुविधांसह इतर अनेक उद्योगांशी विविध प्रकारे  संबंध आहेत. इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात, एकूण आर्थिक विकास साध्य करण्यासाठी घरांच्या गरजा लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे.

 

* * *

S.Bedekar/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2127170)