संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री नवी दिल्लीत आपल्या जपानी समकक्षांसोबत उद्या द्विपक्षीय चर्चा करणार
Posted On:
04 MAY 2025 6:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 मे 2025
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 5 मे 2025 रोजी नवी दिल्लीत जपानचे संरक्षण मंत्री नाकातानी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. दोन्ही देशांचे प्रतिनिधी प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिस्थितीबाबत आपली मते आणि विचार यांची देवाणघेवाण करतील तसेच द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणखी दृढ करण्याच्या मार्गांवर चर्चा करतील.
भारत आणि जपान यांच्यात दीर्घकालीन मैत्री आहे, जी 2014 मध्ये "विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी" या स्तरावर नेल्यानंतर अधिक दृढ आणि गुणवत्तापूर्ण झाली आहे. संरक्षण आणि सुरक्षा हे दोन्ही देशांमधील संबंधांचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत.
भारत आणि जपानमधील संरक्षण सहकार्याला अलीकडच्या काळात अधिक बळ मिळाले आहे, याचे कारण म्हणजे दोन्ही देशांमधील सामरिक विषयांवरील वाढती समान दृष्टी. विशेषतः हिंद-प्रशांत प्रदेशातील शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य या बाबतीतील समान दृष्टिकोनामुळे याचे महत्त्व अधिक वाढले आहे.
दोन्ही संरक्षण मंत्र्यांमधील सहा महिन्यांतील ही दुसरी बैठक असेल. यापूर्वी नोव्हेंबर 2024 मध्ये लाओ पीडीआरमध्ये झालेल्या आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची पहिली भेट झाली होती.
* * *
N.Chitale/N.Gaikwad/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2126808)
Visitor Counter : 17