वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारताची एकूण निर्यात 2023-24 मधल्या 778.1 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 2024-25 मध्ये 6.01% वाढून विक्रमी 824.9 अब्ज डॉलर्सवर पोहोचली : रिझर्व्ह बँक अहवाल
Posted On:
02 MAY 2025 5:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मे 2025
रिझर्व्ह बँकेने मार्च 2025 साठी सेवा व्यापाराबद्दल जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, 2024-25 आर्थिक वर्षात भारताची एकूण निर्यात 824.9अब्ज डॉलर्सच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली आहे. मागील वर्षीच्या 778.1अब्ज डॉलर्सच्या निर्यातीच्या आकडेवारीपेक्षा यावर्षीची निर्यात 6.01% ने जास्त आहे. हा देशाच्या निर्यातीमधला एक महत्वाचा टप्पा आहे.

सेवा निर्यातीच्या वाढीचा वेग वाढत राहिल्याने तिने 2024-25 मध्ये 387.5 अब्ज डॉलर्सचा ऐतिहासिक उच्चांक गाठला. हा आकडा मागील वर्षीच्या 341.1अब्ज डॉलर्स निर्याती पेक्षा 13.6% ने जास्त आहे. सेवा निर्यात मार्च 2024 मध्ये असलेल्या 30अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या तुलनेत मार्च2025 मध्ये 18.6 % ने वाढून 35.6अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी झाली होती.

पेट्रोलियम उत्पादने वगळता व्यापारी मालाची निर्यात 2023-24 मध्ये 352.9अब्ज अमेरिकन डॉलर्स होती. त्याच्या तुलनेत 2024-25 मध्ये ती 6% वाढून विक्रमी 374.1 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली. ही आतापर्यंतची सर्वाधिक वार्षिक बिगर-पेट्रोलियम माल निर्यात आहे.

* * *
N.Chitale/U.Raikar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2126200)
Visitor Counter : 31