आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

योग संगम हे आरोग्यासाठी जागतिक एकतेचे प्रतीक - योगाद्वारे तसेच त्यापलीकडेही जाऊन मानवतेला एकत्र आणणारी एक शक्तिशाली चळवळ


योग संगम पोर्टलची सुरुवात

नाशिकमध्ये भव्य योग महोत्सव साजरा, 6000 हून अधिक जणांनी एकत्रितपणे योगासनांचा केला सराव

Posted On: 02 MAY 2025 4:00PM by PIB Mumbai

नाशिक/मुंबई, 2 मे 2025

 

महाकुंभाची भूमी असलेल्या नाशिकमध्ये योगाचा भव्य महोत्सव साजरा करण्यात आला. आयुष मंत्रालयाच्या मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था (MDNIY) द्वारे आयोजित ‘योग महोत्सवा’त आंतरराष्ट्रीय योग दिन (IDY) २०२५ ला  ५० दिवस उरले असल्याचा काउंट डाऊन साजरा करण्यासाठी ६००० हून अधिक योग प्रेमी नागरिक एकत्र आले होते. पंचवटीतील आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या गौरी मैदानावर आयोजित या कार्यक्रमात भारताच्या समृद्ध योग परंपरेचा उत्सव साजरा करण्यात आला, तसेच ‘योग संगम पोर्टल’ची सुरुवातही करण्यात आली.   देशभरातील १,००,००० हून अधिक ठिकाणी  २१ जून रोजी एकाच वेळी साजरा होणाऱ्या ‘योग दिन’ २०२५ च्या राष्ट्रव्यापी उत्सवाच्या ऑनलाइन नोंदणीसाठी ‘योग संगम पोर्टल’ हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. 

या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले. उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्र्यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित केले आणि म्हणाले की, "नाशिक हे महान विभूतींच्या  उपस्थितीने आशीर्वादित एक पवित्र शहर आहे आणि आज इथे दिलेल्या भेटीमुळे मला अभिमान आणि आनंद वाटत आहे. एकेकाळी भारतीय परंपरेचा अविभाज्य भाग असलेला योग आता आंतरराष्ट्रीय समुदायात प्रगतीपथावर आहे."

योग संगम पोर्टलचे उद्घाटन करताना ते म्हणाले, "आज, नाशिकच्या पवित्र भूमीवर, आम्ही ऑनलाइन नोंदणीसाठी 'योग संगम पोर्टल' सुरू केले आहे, जे आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ च्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. योग संगम हे आरोग्यासाठी जागतिक एकतेचे प्रतीक आहे आणि अशा उपक्रमांद्वारे, ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ योगाद्वारे तसेच त्यापलीकडे जाऊन  मानवतेला एकत्रित आणणारी एक शक्तिशाली जागतिक चळवळ बनत आहे ."

नाशिक येथील योगमहोत्सवाला नाशिकचे खासदार  भास्कर मुरलीधर भगरे , मध्य नाशिकच्या आमदार देवयानी सुहास फरांदे , पश्चिम नाशिकच्या आमदार  सीमा हिरे, पूर्व नाशिकचे आमदार  राहुल उत्तमराव ढिकले, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या  (MUHS) कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर, नाशिकच्या  योग विद्या गुरुकुल चे प्रमुख  डॉ.विश्वास मंडलिक आणि आयुष मंत्रालयाच्या संयुक्त सचिव  मोनालिसा दाश  या मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित होते.

‘योग संगम पोर्टल’ चा वापर करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा : https://yoga.ayush.gov.in/yoga-sangam

 

* * *

PIB Mumbai | JPS/U.Raikar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2126153) Visitor Counter : 36
Read this release in: English , Urdu , Hindi , Malayalam