निती आयोग
भारतातील एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राची स्पर्धात्मकता वाढवण्यासंदर्भात नीती आयोगाने जारी केला अहवाल
Posted On:
02 MAY 2025 3:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मे 2025
नीती आयोगाने भारतीय स्पर्धात्मक संस्थेच्या सहयोगाने तयार केलेला भारतातील एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राची स्पर्धात्मकता वाढवण्यासंदर्भातील अहवाल आज प्रसिद्ध केला. या अहवालात वित्तपुरवठा, कौशल्यविकास, नवोन्मेष आणि बाजारपेठेतील सहज प्रवेश या सर्व पैलूंमध्ये पद्धतशीर सुधारणा करुन भारताच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राच्या अफाट क्षमतेला वाव देण्यासाठी एक सविस्तर आराखडा सादर करण्यात आला आहे.
या अहवालात वस्त्रोत्पादन आणि प्रावरणे, रासायनिक उत्पादने, वाहन उद्योग आणि अन्नप्रक्रिया या चार मुख्य क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून त्याचबरोबर भारतातील एमएसएमई क्षेत्राच्या अफाट क्षमतेला अधिक उलगडण्यासाठी प्रत्येक क्षेत्रासमोरील विशिष्ट आव्हाने आणि संधी यांचा विचार करण्यात आला आह. या अहवालात सध्याच्या राष्ट्रीय आणि राज्यांच्या धोरणांचा अभ्यास केला आहे तसेच अंमलबजावणी आणि एमएसएमई क्षेत्राबद्दल असलेली मर्यादित जागरूकता यांना अधोरेखित केले आहे.
एमएसएमई क्षेत्राला औपचारिक पणे कर्ज उपलब्ध होण्यात झालेली लक्षणीय सुधारणा हा या अहवालातला एक महत्वाचा निष्कर्ष आहे. 2020 ते 2024 या कालावधीत सूक्ष्म आणि लघु उद्योगांना शेडूल्ड बँकांकडून होणाऱ्या कर्ज वितरणात 14% वरून 20% इतकी वृद्धी झाली आहे, तर मध्यम उद्योगांमध्ये देखील कर्ज मिळण्याच्या प्रमाणात 4% वरून 9% वाढ दर्शवत आहे. या सुधारणा झाल्या असल्या तरी वित्तीय तफावत कायम असल्याचे अहवालात म्हटले आहे. याशिवाय या क्षेत्रात कौशल्याचा अभाव दिसून येत असल्याचे अहवालात म्हटले आहे. तसेच बेभरवशाचा वीज पुरवठा, कमकुवत इंटरनेट जोडणी आणि अंमलबजावणीसाठी होणाऱ्या खर्चामुळे एमएसएमईंना आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात अडचणी येतात, असे अहवालात नमूद केले आहे.
धोरण अधिक प्रभावशाली करण्यासाठी राज्य स्तरीय आराखडा आणि त्यांची अंमलबजावणी अधिक मजबूत असणे आवश्यक असून त्यासोबतच सातत्यपूर्ण देखरख, डेटा किंवा माहितीमध्ये योग्य समन्वय आणि धोरण विकासात भागधारकांचा वाढता सहभाग राखणे या गोष्टी अहवालात सुचवल्या आहेत. लक्ष्यित हस्तक्षेप, अधिक मजबूत संस्थात्मक सहभाग आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढवून भारताचे एमएसएमई क्षेत्र शाश्वत आर्थिक विकासाचे प्रमुख चालक बनू शकते.
संपूर्ण अहवाल वाचा: https://www.niti.gov.in/sites/default/files/2025-05/Enhancing_Competitiveness_of_MSMEs_in_India.pdf
* * *
S.Bedekar/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2126135)
Visitor Counter : 20