आयुष मंत्रालय
आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 येऊन ठेपला 50 दिवसांवर : नाशिक उद्या "योग महोत्सव" साजरा करण्यासाठी सज्ज
योगाला जागतिक मान्यता ही भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा पुरावा आहे आणि ही प्रचंड राष्ट्रीय अभिमानाची बाब आहे: प्रतापराव जाधव, केंद्रीय आयुष मंत्री
Posted On:
01 MAY 2025 10:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 मे 2025
आध्यात्मिक वारशासाठी आणि महाकुंभाचे स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले पवित्र शहर नाशिक 2 मे रोजी 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या (आयडीवाय) 50 दिवसांच्या उलटगणनेनिमित्त एक भव्य उत्सव - योग महोत्सव 2025- आयोजित करण्यास सज्ज आहे. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था (एमडीएन आय वाय) द्वारे हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे.
2 मे 2025 रोजी सकाळी 6:30 ते 8:00 दरम्यान पंचवटीतील रामकुंड परिसर येथील गौरी मैदान येथे सामान्य योग प्रोटोकॉल (सीवायपी) च्या सामूहिक प्रात्यक्षिकाने महोत्सवाची सुरुवात होईल. याप्रसंगी केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांच्यासह अनेक मान्यवर, योग अभ्यासक आणि सर्व स्तरातील नागरिक उपस्थित राहतील.
आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी नाशिकमधील नागरिकांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आणि ते म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे संयुक्त राष्ट्रांनी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला. योगाला मिळालेली ही जागतिक मान्यता भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा पुरावा आहे आणि ती प्रचंड राष्ट्रीय अभिमानाची बाब आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन जागतिक एकता, कल्याण आणि सुसंवादाचे प्रतीक आहे, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील वार्षिक सामूहिक योग प्रदर्शनांसह. त्याच भावनेने आणि उत्साहाने आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 ची तयारी याआधीच जोरात सुरू झाली आहे."
आयुष मंत्रालय प्रत्येक नागरिकाला या परिवर्तनकारी उत्सवाचा भाग होण्यासाठी आमंत्रित करत आहे. 21 जून 2025 ची उलटगणना जसजशी पुढे सरकत आहे, तसा संदेश स्पष्ट आहे: योग हा केवळ एक सराव नाही - ती राष्ट्रीय आरोग्य, आंतरिक शांती आणि जागतिक कल्याणासाठीची एक चळवळ आहे.
* * *
N.Chitale/N.Mathure/D.Rane
(Release ID: 2125981)
Visitor Counter : 23