अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अरविंद श्रीवास्तव यांनी आज केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाच्या सचिवपदाचा स्वीकारला कार्यभार

Posted On: 01 MAY 2025 4:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 मे 2025

 

अरविंद श्रीवास्तव यांनी आज केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाच्या सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला.

18 एप्रिल 2025 रोजी मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने श्रीवास्तव यांची महसूल विभागाच्या सचिवपदी नियुक्ती केली.

कर्नाटक केडरचे 1994 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (आय ए एस) अधिकारी असणारे श्रीवास्तव यांनी यापूर्वी पंतप्रधान कार्यालयात संयुक्त सचिव आणि नंतर अतिरिक्त सचिव म्हणून काम पाहिले आहे.

त्यापूर्वी श्रीवास्तव यांनी अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या अर्थसंकल्प विभागात संयुक्त सचिव; आशियाई विकास बँकेत विकास अधिकारी; बेंगळुरू येथे वित्त विभागाचे सचिव; बेंगळुरू येथे शहरी विकास विभागाचे सचिव; कर्नाटकातील शहरी पायाभूत सुविधा विकास आणि वित्त महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही काम केले आहे.

   

 

* * *

N.Chitale/N.Mathure/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2125795) Visitor Counter : 14