गृह मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राजकीय व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने आगामी जनगणनेत जातनिहाय गणनेचा समावेश करण्याच्या निर्णयाचे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केले स्वागत, मोदी सरकारच्या सामाजिक न्यायाप्रति असलेल्या बांधिलकी अंतर्गत घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे केले प्रतिपादन
मोदी सरकारच्या या निर्णयामुळे सर्व आर्थिक आणि सामाजिकदृष्टया मागास वर्गाचे सक्षमीकरण होईल आणि समावेशकतेला चालना मिळेल
Posted On:
30 APR 2025 9:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 एप्रिल 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राजकीय व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीच्या(सीसीपीए) आगामी जनगणनेत जातनिहाय गणनेचा समावेश करण्याच्या निर्णयाचे स्वागत करत, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी मोदी सरकारच्या सामाजिक न्यायाप्रति असलेल्या बांधिलकी अंतर्गत घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे प्रतिपादन केले आहे.
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्र्यांनी एक्स या मंचावर म्हटले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली सीसीपीएच्या बैठकीत जनगणनेमध्ये जातिनिहाय गणनेचा समावेश करण्याचा निर्णय घेऊन एका ऐतिहासिक चुकीची आज दुरुस्ती केली आहे आणि समाजातील प्रत्येक घटकासाठी सामाजिक समता आणि न्याय याविषयीच्या आपल्या भक्कम बांधिलकीचा एक संदेश दिला आहे.
अमित शाह म्हणाले, काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी दशकानुदशके सत्तेत असताना जातिनिहाय गणनेला विरोध केला, पण विरोधात असताना त्यांनी ते आपले निवडणुकीचे हत्यार बनवले. हा निर्णय सर्व आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांना सक्षम करेल, समावेशनाला प्रोत्साहन देईल आणि दुर्बल घटकांच्या प्रगतीसाठी नवीन मार्ग तयार करेल.
* * *
N.Chitale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2125628)
Visitor Counter : 9