पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे भिंत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल व्यक्त केला शोक
प्रधानमंत्री राष्ट्रीय मदतनिधीतून मदतीची घोषणा
Posted On:
30 APR 2025 11:23AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 एप्रिल 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे भिंत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी प्रत्येक मृत व्यक्तीच्या नातेवाइकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.
एक्स या समाज माध्यमावरील 'पीएमओ इंडिया' या अधिकृत हँडलवर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे:
"आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे भिंत कोसळल्याने झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दुःख झाले. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याविषयी माझ्या संवेदना व्यक्त करतो. तसेच या घटनेत जखमी झालेले नागरिक लवकर बरे व्हावेत हीच प्रार्थना.
प्रत्येक मृत व्यक्तीच्या नातेवाइकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल."
* * *
S.Bedekar/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2125365)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam