सांस्कृतिक मंत्रालय
रामानुजन यांच्या जीवनकार्यावरील पुस्तकाचे 30 एप्रिलला प्रकाशन
रामानुजन: जर्नी ऑफ अ ग्रेट मॅथेमॅटिशियन
Posted On:
28 APR 2025 11:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 एप्रिल 2025
राष्ट्रीय अभिलेखागारच्यावतीने (नॅशनल आर्काइव्हज ऑफ इंडिया) "रामानुजन: जर्नी ऑफ अ ग्रेट मॅथेमॅटिशियन" हे पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे. या पुस्तक प्रकाशनानंतर 30 एप्रिल 2025 रोजी नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात 'लेगसी ऑफ रामानुजन' या विषयावर एक समूह चर्चा होईल.
हे पुस्तक म्हणजे भारतातील सर्वात असामान्य गणितज्ज्ञ, प्रतिभावंतांपैकी एक असलेल्या श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनाचा आणि त्यांच्या योगदानाचा सखोल अभ्यास मांडणारा ऐतिहासिक वृत्तांत आहे. रामानुजन यांचा प्रवास, तामिळनाडूतील इरोड येथून सुरू झाला. सर्वसामान्य काळात त्यांनी केलेला गणिताचा अभ्यास आणि त्यामधील संशोधन करताना त्यांनी मांडलेले संख्या सिद्धांत, तसेच गणितातील इन्फीनाइट म्हणजेच अनंताची संकल्पना आणि निरंतर गणिती अवयव पाडत जाण्याची पध्दती याविषयी रामानुजन यांनी केलेल्या अभूतपूर्व कामापर्यंतचे बारकाईने वर्णन या पुस्तकामध्ये केले आहे. रामानुजन यांनी गणिताचे औपचारिक प्रशिक्षणाचा घेतले नव्हते, तरीही जगभरातील गणितज्ञांना आश्चर्यचकित करणारे प्रमेय(थियरम) आणि परिणाम (रिजल्ट)कसे निर्माण केले यावर या पुस्तकामध्ये प्रकाश टाकला आहे.
या पुस्तकाच्या लेखनासाठी मूळ दस्तऐवजाचा तसेच पत्रांचा सुयोग्य वापर केल्याने पुस्तक वेगळे ठरले आहे. यातून वाचकांना रामानुजनच्या जीवनाची प्रामाणिक झलक वाचायला मिळणार आहे. यामध्ये रामानुजन आणि जी.एच. हार्डी सारख्या प्रमुख व्यक्तींमध्ये झालेल्या पत्रव्यवहाराचा समावेश आहे. हार्डी यांनी रामानुजन यांचे महान कार्य जागतिक स्तरावर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
रामानुजन यांची कहाणी केवळ गणितातील प्रतिभेबद्दल नाही तर त्यांच्यामध्ये असलेल्या चिकाटीची, त्यांना गणित या विषया लागलेला ध्यास याचीही आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून रामानुजन यांच्या कार्याला, त्यांनी चालवलेल्या वारशाला श्रद्धांजली वाहण्याचे कार्य केले आहे. त्याचबरोबर आगामी पिढ्यांना गणितामधील सौंदर्य आणि त्यामागील मानवी आत्मा शोधण्यासाठी हे पुस्तक प्रेरणादायी ठरणार आहे..
भारतीय राष्ट्रीय अभिलेखागाराला आयएसओ प्रमाणपत्र मिळाले आहे. या पुस्तक प्रकाशनाच्यावेळी 30 एप्रिल 2025 रोजी अभिलेख पटल आवृत्ती 3.0 चा प्रारंभ करण्यात येणार आहे.
* * *
S.Bedekar/H.Kulkarni/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2125074)
Visitor Counter : 10