संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

चौथ्या अत्याधुनिक गस्ती जहाजाच्या (3040)  बांधणी कामाचा प्रारंभ

Posted On: 25 APR 2025 8:23AM by PIB Mumbai

 

चौथ्या अत्याधुनिक गस्ती जहाजाच्या (3040)  बांधणी कामाचा प्रारंभ 24 एप्रिल 25 रोजी कोलकात्यातील  गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड (जीआरएसई) येथे करण्यात आला .

युद्धनौका उत्पादन आणि अधिग्रहण नियंत्रक व्हाईस ॲडमिरल राजाराम स्वामीनाथन, या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तसेच जीआरएसई चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कमांडर पीआय हरी (निवृत्त) आणि भारतीय नौदल आणि शिपयार्डमधील इतर वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.एनजीओपीव्हीच्या बांधकामातील ही कामगिरी एक  महत्त्वपूर्ण क्षण असून भारताच्या स्वदेशी जहाजबांधणी अत्याधुनिक क्षमता  प्रदर्शित करतो. 

त्याचबरोबर  30 मार्च 23 रोजी गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL), गोवा आणि गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स (GRSE), कोलकाता यांच्याबरोबर स्वदेशी बनावटीच्या अकरा गस्ती नौकांच्या  बांधणीसाठी एका करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. यापैकी सात नौकांचे बांधकाम लीड शिपयार्ड जीएसएल तर चार नौकांचे बांधकाम  फॉलो शिपयार्ड जीआरएसई करणार आहे.

अंदाजे 3000 टन वजनासह ही जहाजे (NGOPVs), तटीय संरक्षण आणि देखरेख , शोध आणि बचाव कार्ये, किनाऱ्यावरील मालमत्तेचे संरक्षण करणे आणि चाचेगिरी विरोधी मोहिमांसाठी खास तयार केली जात आहेत .    प्रकल्पाच्या एकूण कालमर्यादेतला किल लेइंग हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या अकरा गस्तीनौकांची निर्मिती  'आत्मनिर्भर भारत' आणि 'मेक इन इंडिया' ला अनुरूप असून भारतीय नौदलाचे सागरी सामर्थ्य वाढवण्यासाठी  सज्ज आहेत.

***

S.Kane/S.Patgonakar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2124241) Visitor Counter : 22