पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 24 एप्रिल रोजी बिहारला भेट देणार
पंतप्रधान बिहारमधील मधुबनी येथे राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात होणार सहभागी
पंतप्रधान बिहारमध्ये 13,480 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण करणार
पंतप्रधान बिहारमध्ये अमृत भारत एक्सप्रेस आणि नमो भारत रॅपिड रेल्वेला दाखवणार हिरवा झेंडा
Posted On:
23 APR 2025 9:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 एप्रिल 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 एप्रिल रोजी बिहारला भेट देतील. ते मधुबनीला जाऊन सकाळी 11:45 वाजता राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील. ते 13,480 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण करतील आणि यावेळी उपस्थितांना संबोधित करतील.
पंतप्रधान बिहारमधील मधुबनी येथे राष्ट्रीय पंचायती राज दिन कार्यक्रमात सहभागी होतील. यावेळी ते सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पंचायतींचा गौरव आणि प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय पंचायत पुरस्कार देखील प्रदान करतील.
पंतप्रधान बिहारमधील गोपाळगंज जिल्ह्यातील हथुआ येथे सुमारे 340 कोटी रुपयांच्या रेल्वे अनलोडिंग सुविधेसह एलपीजी बॉटलिंग प्रकल्पाची पायाभरणी करतील. यामुळे पुरवठा साखळी सुव्यवस्थित होण्यास आणि मोठ्या प्रमाणात एलपीजी वाहतुकीची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होईल.
या प्रदेशातील वीज पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी, पंतप्रधान 1,170 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि सुधारित वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत बिहारमधील ऊर्जा क्षेत्रात 5,030 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करतील.
देशभरात रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेनुसार, पंतप्रधान सहरसा आणि मुंबई दरम्यान अमृत भारत एक्सप्रेस, जयनगर आणि पाटणा दरम्यान नमो भारत रॅपिड रेल्वे आणि पिपरा आणि सहरसा आणि सहरसा आणि समस्तीपूर दरम्यानच्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. ते सुपौल पिपरा रेल्वे लाईन, हसनपूर बिथन रेल्वे लाईन आणि छपरा आणि बगहा येथे दुपदरी रेल्वे ओव्हर ब्रिजचे उद्घाटन देखील करतील. ते खगरिया-अलौली रेल्वे लाईन राष्ट्राला समर्पित करतील. या प्रकल्पांमुळे कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि प्रदेशाचा एकूण सामाजिक-आर्थिक विकास होईल.
पंतप्रधान दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (डीएवाय - एनआरएलएम) अंतर्गत बिहारमधील 2 लाखांहून अधिक बचत गटांना सामुदायिक गुंतवणूक निधी अंतर्गत सुमारे 930 कोटी रुपयांच्या लाभांचे वितरण करतील.
पंतप्रधान पीएमएवाय-ग्रामीणच्या 15 लाख नवीन लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे देखील प्रदान करतील आणि देशभरातील 10 लाख पीएमएवाय-जी लाभार्थ्यांना हप्ते जारी करतील. बिहारमधील 1 लाख पीएमएवाय-ग्रामीण आणि 54,000 पीएमएवाय-शहरी घरांच्या गृहप्रवेशाचे औचित्य साधून ते काही लाभार्थ्यांना चाव्या सुपूर्द करतील.
* * *
S.Patil/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2123971)
Visitor Counter : 30