वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विकसित भारतासाठी गावांना सक्षम करण्याच्या उद्देशासह भारतीय गुणवत्ता परिषदेने पंचायती राज दिन केला साजरा

Posted On: 22 APR 2025 9:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 एप्रिल 2025

 

भारतीय गुणवत्ता परिषदेने (क्यूसीआय) केंद्रीय जलशक्ती मंत्रालयासह ‘स्वच्छ आणि सुजल गावांसाठी नेतृत्व’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करून आज पंचायती राज दिन साजरा केला.

सरपंच संवाद कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या क्यूसीआयच्या या एक दिवसीय उपक्रमात ग्रामीण भारतातील गुणवत्ता-धारित परिवर्तनाला चालना देण्यात मुलभूत स्तरावरील नेत्यांच्या भूमिकेवर अधिक प्रकाश टाकण्यात आला. या कार्यक्रमाने देशभरातील 200 हून अधिक सरपंच, धोरण क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती, विषयाशी संबंधित तज्ञ व्यक्ती आणि ज्येष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना एकत्र आणले.

सरपंच संवाद उपक्रमाअंतर्गत यशस्वी सहभागापाठोपाठ आयोजित या विशेष कार्यक्रमाने मूलभूत स्तरावरील प्रयत्नांचे दर्शन घडवणे आणि पंचायत स्तरावरील विकासाला विकसित भारत 2047च्या राष्ट्रीय संकल्पनेशी अनुसरून घेणे यासाठीचा एक बहुआयामी मंच म्हणून काम केले.  

मूलभूत पातळीवरील कार्याप्रती क्यूसीआयच्या वचनबद्धतेचे दर्शन घडवत, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील म्हणाले, “क्यूसीआयतर्फे आयोजित सरपंच संवाद हा असा एक शक्तिशाली मंच आहे जेथे सरपंच त्यांना पायाभूत पातळीवर भेडसावणाऱ्या समस्या थेटपणे मांडू शकतात आणि मंत्रालय त्या सोडवण्यासाठी पुढील कार्यवाही करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी देशातील सरपंचांना पर्जन्य जलसंधारणासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून स्वच्छ आणि सुजल गावे निर्माण करण्यात प्राविण्य मिळवावे लागेल. भारताचा आवाज प्रथम गावांतून घुमतो आणि तो सर्वोच्च पातळीवर दुमदुमला पाहिजे.”

आज दिवसभरात पार पडलेल्या सत्रांतून जल संरक्षण आणि स्वच्छताविषयक शाश्वततेपासून स्वच्छ आणि सुजल गावांच्या निर्मितीच्या आराखड्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या विषयांवर विचारविनिमय झाला. देशभरातून आलेल्या सरपंचांनी या कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेतला.

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2123628) Visitor Counter : 11
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil