दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
आंतरराष्ट्रीय दूरसंवाद संघाच्या (आयटीयू) अव्वल नेतृत्वाच्या पदावर भारताची दावेदारी
आयटीयूच्या रेडियो कम्युनिकेशन ब्युरोच्या संचालकांच्या पदासाठी भारतीय उमेदवार म्हणून एम.रेवती यांचे नामांकन
Posted On:
22 APR 2025 1:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 एप्रिल 2025
दूरसंवाद विभागातील जॉइंट वायरलेस सल्लागार एम. रेवती यांचे आंतरराष्ट्रीय दूरसंवाद संघाच्या रेडियो कम्युनिकेशन ब्युरोच्या संचालकपदासाठी आपल्या उमेदवार म्हणून भारताने नामांकन केले आहे. यामुळे जागतिक रेडियो स्पेक्ट्रम प्रशासनावर अनेक दशकांनंतर अतिशय महत्त्वाचा असा दावा भारताकडून करण्यात आला आहे. आयटीयू ही संयुक्त राष्ट्रांची जिनिव्हास्थित एक विशेष संस्था असून ती जागतिक दळणवळण प्रणाली एकत्रितपणे, सुरक्षित, संरक्षित आणि न्याय्य पद्धतीने काम करेल हे सुनिश्चित करते. रेडियो कम्युनिकेशन ब्युरो जागतिक रेडियो फ्रिक्वेन्सींचे आणि 5जी, 6जी, स्पेस ब्रॉडबँड, आपत्ती प्रतिसाद यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या उपग्रहांच्या कक्षांचे नियमन करतो आणि या परिमित संसाधनांचे व्यवस्थापन करतो.

या संस्थेच्या संचालक म्हणून पुढील पिढीतील रेडियो कम्युनिकेशन मापदंडांना आकार देण्यात आणि न्याय्य स्पेक्ट्रम उपलब्धता सुनिश्चित करण्यात रेवती मध्यवर्ती भूमिका बजावतील. त्यांच्या उमेदवारीमुळे भारताचा वसुधैव कुटुंबकम हा दृष्टीकोन आणि समावेशक डिजिटल विकासाचा केल्या जाणा-या आग्रहामुळे विशेषतः विकसनशील देशांना मिळू शकलेला लाभ प्रतिबिंबित होतो.
आयटीयू विषयी:
आयटीयू ही संयुक्त राष्ट्रांची डिजिटल तंत्रज्ञानाकरिता(आयसीटीज्) विशेष संस्था आहे. या संघटनेत 194 सदस्य देश असून, 1000 पेक्षा जास्त कंपन्या,विद्यापीठे आणि आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक संघटनांचा समावेश आहे. स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हा येथे तिचे मुख्यालय आहे आणि प्रत्येक खंडात प्रादेशिक कार्यालये असून संयुक्त राष्ट्रांच्या कुटुंबातील सर्वात जुनी म्हणजे, 1865 मध्ये तारायंत्राचा शोध लागल्यापासून अस्तित्वात आलेली संस्था आहे.
Follow DoT Handles for more: -
* * *
S.Bedekar/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2123410)
Visitor Counter : 13