आयुष मंत्रालय
देशभरात आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 साजरा करण्यासाठी हॉटेल आणि रेस्टॉरंट महासंघाने सुरू केली तयारी
Posted On:
21 APR 2025 9:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 एप्रिल 2025
देशाच्या कानाकोपऱ्यात योगाचे फायदे पोहोचवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला अनुसरून, सार्वजनिक योग उपक्रमांमध्ये खाजगी क्षेत्राने नेतृत्वाची भूमिका घेतली आहे.
यालाच अनुसरून, फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (FHRAI) ने आपल्या प्रारंभिक योजना जाहीर केल्या आहेत. संघटनेच्या सदस्यांनी अत्यंत अभिमानाने "हरित योग" उपक्रम हाती घेतला आहे. यात पुढील उपक्रम समाविष्ट आहेत :
- 22 एप्रिल 2025 रोजी योग रिट्रीट: आत्मांतन वेलनेस सेंटर, मुळशी, महाराष्ट्र. हे सह्याद्रीच्या शांत टेकड्यांमध्ये वसलेले एक मंत्रमुग्ध करणारे योग उपासनेचे ठिकाण आहे जे निसर्गाशी आणि स्वतःशी खोलवरचे नाते निर्माण करण्यास मदत करते.
- 29 एप्रिल 2025 रोजी कॅम्पस कार्यक्रम: FHRAI इन्स्टिट्यूट ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट (FHRAI-IHM), ग्रेटर नोएडा. भविष्यातील हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील प्रमुखांना योग आणि शाश्वततेच्या तत्त्वांमध्ये सहभागी करून घेणारा एक उत्साही कॅम्पस कार्यक्रम.
- 17 मे 2025 रोजी जेडब्ल्यू मॅरियट, बंगळुरू येथे आयोजन: शहराच्या मध्यवर्ती भागात एका प्रमुख मेळाव्यात योग, संवाद आणि सामुदायिक कृतीच्या समृद्ध मिश्रणाद्वारे शहरी जीवनातील निरामयता साजरी केली जाणार.
हरित योग हा आयुष मंत्रालयाने आयुष दिन 2025 च्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या 10 मुख्य उपक्रमांपैकी एक आहे, जो आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याला 10 वर्षे पूर्ण होत असल्या प्रित्यर्थ आयोजित केले जात आहेत. हा प्रकल्प निरोगीपणा आणि पर्यावरणीय जागरूकतेची सांगड घालत असून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी योगाच्या माध्यमाचा वापर करण्याचा प्रयत्न आहे . हरित योग उपक्रम सामान्यतः योग सत्रांच्या पलीकडे जाऊन यात सहभागी होणारे लोक वृक्षारोपण, समुद्रकिनारा स्वच्छता आणि समुदाय-चालित पर्यावरणीय प्रयत्नांसारख्या पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये भाग घेतील. याशिवाय हवामान बदल आणि संवर्धन, शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देणे यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर शैक्षणिक मोहिमा देखील आयोजित केल्या जाणार आहेत.
* * *
S.Kane/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2123309)
Visitor Counter : 8